मुंबई : दारु पिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. सध्या सोशल मीडियावरल दारु शरीरासाठी कशी चांगली असते असा मेसेज वायरल होत आहे. खरंच अस आहे का? दारु प्यायल्याने शरीरावर चांगले परिणाम होतात? नियमित दारुचे सेवन केल्याने शरीर बलवान होते? दारु प्यायल्याने आजार कमी होतात? खरच असं आहे का? या प्रश्नांची उत्तरं 'वायरल चेक'मधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

वायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दारु पिणे शरीरासाठी कशा प्रकारे चांगली नाही याचा दावा केला आहे.

या मेसेजमध्ये केलेला दावा नक्की काय आहे?

  • दारु पिल्याने लठ्ठपणा कमी होतो

  • दारुत ओवा टाकून पिल्याने पोटातील जंतू मरतात

  • रिकाम्या पोटी दारु प्यायल्याने पोटदुखी बरी होते


वायरल मेसेजवर तज्ञ डॉक्टरांचे मत

वायरल होणाऱ्या मेसेजची आम्ही तज्ञ डॉक्टरांना यासंबंधी विचारणा केली. यात त्यांनी वायरल होणारा मेसेज हा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच वायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दारु प्रमाणात पिणे चांगले असते असा दावा करण्यातच आला होता त्याबद्दल डॉक्टरांना विचारले असता त्यांनी होणाऱ्या परिणामाबद्दल ही सांगितले.

दारुचे सेवन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या पोटात फर्मेंटेशन होतं, तसेच गॅसेसचे प्रमाणही वाढते. यामुळे तुमचे जेवण कमी होतं. याचा थेट परिणाम तुमच्या यकृतावर होतो. यावरुन दारु पिणे शरीरासाठी कोणत्याही प्रकारे चांगली नाही.  त्यामुळे वायरल होणाऱ्या मेसेजमध्ये केला गेलेला दावा खोटा आहे.