Travel : आपण अनेकदा वडिलधारी मंडळींकडून ऐकतो, 'लग्नापूर्वी जगून घ्या.. एकदा लग्न झालं की मग अडकलात...'तसं पाहायला गेलं तर लग्नापूर्वीचा काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. हे दिवसचं वेगळे असतात. या काळात तुमची मैत्री तुमची साथ कधीच सोडत नाही. यामुळेच लोक लग्नाआधी मित्रांसोबत पार्टी करून सिंगल लाईफ एन्जॉय करतात. मित्रांसह बॅचलोरेट पार्टीचा प्लॅन करणे, हा तुमचा आनंद दर्शविण्याचा एक चांगला मार्ग आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. सहलीसोबतच तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत पार्टी करता येईल.
मनाली- निसर्ग आणि साहसाचे नंदनवन
तुमच्याकडील बजेटमध्ये मित्रांसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय करायची असेल तर मनाली हा उत्तम पर्याय आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचक Activity चा आनंद घेण्यासाठी तुम्हाला हे ठिकाण नक्की आवडेल. हे हिल स्टेशन सुंदर दऱ्या आणि साहसी खेळांसाठी ओळखले जाते. येथे तुम्ही रात्रभर मित्रांसोबत पार्टी करू शकता आणि मजा करू शकता. अशा सुंदर ठिकाणी आपल्या बॅचलर लाइफला निरोप देणे प्रत्येकासाठी संस्मरणीय असेल.
1500 ते 4000 रुपयांमध्ये बजेट हॉटेल्स आणि होमस्टे सहज मिळू शकतात.
एकूण खर्च : सुमारे रु 15000-20000 प्रति व्यक्ती, ज्यात प्रवास, निवास आणि इतर Activity खर्च समाविष्ट आहे.
लेह-लडाख- एक साहसी सहल
तुम्हाला बॅचलर पार्टी रोमांचक बनवायची असेल तर लेह-लडाखला जा. बॅचलर पार्टी ही फक्त खाणे, पिणे आणि नाचणे यासाठीच असते असे नाही. तुम्ही सहलीला जाऊनही तुमचे अनमोल क्षण साजरे करू शकता. लेह-लडाख हे एक अनोखे डेस्टिनेशन आहे, जिथे तुम्हाला साहसासोबतच शांतता अनुभवता येईल. तुमच्या बॅचलर लाइफचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला यापेक्षा चांगली जागा मिळणार नाही. बॅचलर पार्टीसोबत इथे लोक त्यांच्या हनीमूनसाठीही जातात, ते तुमच्यासाठी खरोखरच संस्मरणीय असेल.
येथे तुम्ही सुंदर तलावाच्या काठावर कॅम्पिंगसह नाईट पार्टी करू शकता.
खर्च- प्रति व्यक्ती सुमारे 25,000-35,000 रुपये असू शकतात, ज्यामध्ये प्रवास, निवास आणि इतर Activity खर्च समाविष्ट आहेत. ग्रुपने प्रवास केल्यास खर्च आणखी कमी होऊ शकतो.
गोवा- पार्टीसाठी बेस्ट..!
बॅचलर पार्टीची चर्चा झाली तर गोव्याचे नाव नक्कीच पुढे येईल. गोव्यामध्ये तसेच आसपास अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, विविध चर्च आणि सुंदर समुद्रकिनारे, नाईटआऊट पार्टी जी तुमचे बॅचलर लाइफ संस्मरणीय बनवतील. यासोबतच लग्नाआधी तुम्ही उटी, मुन्नार, कूर्ग सारख्या ठिकाणी बॅचलर ट्रिपची योजना आखू शकता.
एकूण खर्च- सुमारे 20,000-30,000 रुपये प्रति व्यक्ती, ज्यामध्ये प्रवास, निवास आणि इतर Activity खर्च समाविष्ट आहेत.
हेही वाचा>>>
Travel : सप्टेंबरमध्ये बनेल बेस्ट पिकनिक प्लॅन! भारतातील 'ही' ठिकाणं पावसाळ्यात होतात आणखी सुंदर, कुटुंबासह फिरण्यासाठी आताच प्लॅन करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )