Travel : अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपलाय. काही दिवसांनंतर उन्हाचे चटके देणारे दिवस संपतील आणि सुखद गारव्याच्या दिवसांना सुरूवात होईल. पावसाळ्यात जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील हिल स्टेशनला भेट देण्याची चर्चा होते, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनचे नाव नक्कीच येते. अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते, हिरवाईने नटलेल्या महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी! हनिमून कपल्ससाठी स्वर्गच जणू.. जाणून घ्या या हिल स्टेशनबद्दल..


 


पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जणू हिरवाईची चादरच पांघरलेली असते..



महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशनबद्दल तुम्ही ऐकले असेलच. अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. माथेरानमध्ये टॉय ट्रेनचा प्रवास खूप लोकप्रिय आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी शांत जागा शोधत असाल, तर माथेरान हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते माथेरान, सुंदर दऱ्या, वाहणारे धबधबे आणि स्वच्छ हवा पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्याचे आमंत्रण देतात. माथेरानला वर्षभर पर्यटक भेट देत असतात, मात्र पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जणू हिरवाईची चादरच पांघरलेली असते.पावसाळ्यात हा सगळा परिसर धुक्यात लपला जातो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. सुट्ट्यांमध्ये, मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त असते: माथेरानमध्ये अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता.




मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त


पॅनोरमा पॉइंट : मुख्य बाजारपेठेपासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेला पॅनोरमा पॉइंट हा माथेरानचा सर्वात मोठा पॉइंट मानला जातो. हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट देखील आहे. या ठिकाणाहून खंडाळा भीमशंकर पर्वत रांगाही दिसतात.


हार्ट पॉईंट : रात्रीची मुंबई कशी दिसते हे पाहायचे असेल तर तेही माथेरानमधून… तर चला थेट हार्ट पॉईंटला जाऊ या.


द इको पॉईंट : नावाप्रमाणेच, माथेरानच्या इको पॉइंटवर उभे असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव ओरडले तर पर्वत तुमच्यासोबत तुमच्या जोडीदाराचे नावही ओरडतील.


लौसा पॉइंट : येथील धबधबे पावसाळ्यात माथेरानच्या या पॉइंटचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात.


मंकी पॉइंट: होय, येथे तुम्हाला लहान ते मोठ्या आकाराची अनेक माकडे त्यांच्या नैसर्गिक वातावरणात खेळताना आणि फिरताना दिसतील. या क्षणी आपले सामान काळजीपूर्वक ठेवा.


शार्लोट लेक : माथेरान पोस्ट ऑफिसपासून फक्त 2 किमी अंतरावर असलेल्या शार्लोट लेकच्या आसपास तुम्हाला अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील. या तलावाच्या उजव्या बाजूला पीसरनाथ मंदिर आहे आणि डाव्या बाजूला इको पॉइंट आणि लॉसा पॉइंट आहे. या तलावातून संपूर्ण माथेरान शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.




माथेरानला कधी आणि कसे जायचे?


माथेरानला वर्षभर पर्यटक येतात, पण माथेरानला भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ हा उत्तम असतो. माथेरान हे महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण म्हणून घोषित केले आहे, त्यामुळे तेथे वाहने जात नाहीत. येथे जाण्यासाठी तुम्हाला इतर मार्गांचा अवलंब करावा लागेल.


मुंबईहून माथेरानला जाण्यासाठी रेल्वेने आधी नेरळ गाठावे लागते.
नेरळहून तुम्हाला टॅक्सी मिळेल, तिथून तुम्ही दस्तुरीला पोहोचाल.
लक्षात ठेवा, पावसाळ्यात कधी-कधी टॉय ट्रेनही बंद पडते.
नेरळहून तुम्ही माथेरानला गाडीने किंवा टॉय ट्रेनने (उपलब्ध असल्यास) पोहोचू शकता. मुंबईहून दस्तुरी गावाला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा कार देखील घेऊ शकता.
ते मुंबईपासून 90 किमी आणि पुण्यापासून 120 किमी अंतरावर आहे.


 


 


हेही वाचा>>>


Travel : मान्सून येतोय...त्याआधीच महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं जाणून घ्या, जी पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतात!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )