मुंबई: जेव्हा कधी एखाद्याचं ब्रेकअप होतं त्यावेळचे क्षण फारच कठीण असतात. अनेकदा काही जण स्वत:ला संभाळू देखील शकत नाहीत. अनेकदा स्वत:च्या जीवाचं बरं-वाईटही करुन घेण्यास मागेपुढे पाहत नाही.


 

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, तुमच्या आयुष्याहून दुसरी कोणतीही गोष्ट मोठी नाही. त्यामुळे बेक्रअपनंतर स्वत:ला संभाळण्यासाठी या काही खास टिप्स:

 

- ब्रेकअपनंतर अगदीच एकटं-एकटं वाटू लागतं. त्यामुळे अनेकदा मनात वाईट विचार येतात. यासाठी तुम्ही अधिकाधिक वेळ तुमच्या मित्रांसोबत घालवा. जेणेकरुन तुम्ही तुमचं दु:ख नक्की विसराल.

 
- तुमच्या पूर्वीच्या प्रियकर किंवा प्रेयसीचा फार विचार करत बसू नका. किंबहुना अजिबात कॉन्टॅक्टही करु नका.

 

- जे झालं ते विसरुन दुसऱ्या गोष्टींचा विचार करा. तुमच्या कामावर पूर्ण फोकस असू द्या. जेणेकरुन तुमचं मन त्यामध्ये गुंतून राहिल.

 

- शक्य असल्यास एखाद्या मोठ्या सुट्टीवर जा. या सुट्टीमध्ये कुठल्या तरी छान पर्यटनस्थळी फिरुन या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल आणि परतल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्यानं तुमचं आयुष्य जगू शकाल.