जन्म दाखला मिळवण्याच्या सोप्या पद्धती
ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. जन्मदाखल्याची कॉपी मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र 20 रुपये फी भरावी लागेल. यानंतर काहीकाळातच तुमचा जन्मदाखला तुम्हाला मिळून जाईल.
तसेच तमचा सध्याचा रहिवाशी दाखला आणि जन्मावेळीचा रहिवाशी दाखला अर्जासोबत जोडणे अवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे एखादे ओळखपत्र असणेही गरजेचे आहे.
तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी जन्म दाखला हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे हा दाखला बनवताना अनेक किचकट आणि गुंतागुतीच्या प्रक्रिया पार कराव्या लागत असत. पण यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जही करुन हे मिळवता येते.
शासकीय नोकरींमध्येही जन्म दाखला अतिशय आवश्यक आहे.
जन्म दाखल्याचा उपयोग शाळेत प्रवेश घेण्यापासून ते पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वच कामांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
तुम्हाला जन्माचा दाखला मिळवताना अर्ज करतेवेळी अर्जामध्ये तुमचे आणि तुमच्या आई-वडिलांची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
जर तुमच्या आई-वडिलांना काही कारणास्तव तुमच्या जन्माच्यावेळी जन्म दाखला बनवणे शक्य झाले नसेल, तरीही तुम्ही काळजी घेण्याचे काही कारण नाही.
एखाद्या रुग्णालयात मुलाच्या जन्मानंतर संबंधित रुग्णालय प्रशासन त्या मुलाची नोंद स्थानिक प्रशासानाकडे करते. जर तुम्हाला रुग्णालयातून तुमच्या तान्हुल्यासोबत त्याच्या आईला डिस्चार्ज घेताना, जन्म दाखला मिळाला नाही. तर तुम्ही 21 दिवसांच्या आत स्थानिक प्रशासनाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावे लागते.
कारण यासाठी तुम्हाला तुमच्या जन्म दाखल्यासाठी SDM (उपविभागीय कार्यालय)मध्ये जाऊन तिथे तुमची नोंद करावी लागेल. या नोंदणीनंतर तुम्ही जन्मदाखल्यासाठी अर्ज करु शकता. सर्वसाधारणपणे उपविभागीय कार्यालय अशाप्रकारच्या नोंदीसाठी परवानगी देते.