Tamanna Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या अभिनयासाठी जितकी लोकप्रिय आहे, तितकीच ती तिच्या फिटनेस आणि फिटनेसच्या शिस्तीसाठीही ओळखली जाते. तमन्ना जितकी सुंदर आहे तितकीच ती तिच्या फिटनेसचीही काळजी घेते . (Tamanna BHatia Fitness) बहुतांश लोक वजन कमी करतात पण थोड्याच काळात पुन्हा वाढतं, कारण ते कायमस्वरूपी  हल्दी सवयी निर्माण करण्याऐवजी झटपट उपायांवर भर देतात. कलाकारांना त्यांच्या कामासाठी कधी वजन कमी करावे लागतं तर कधी वाढवावं लागतं . पण हे करताना कुठल्याही अघोरी पद्धतीने वजन कमी किंवा वाढवण्याचे प्रयत्न ते करत नाहीत . याचे उदाहरण म्हणजे नुकतच तमन्ना भाटियाने अवघ्या 90 दिवसात तब्बल पाच ते दहा किलो वजन कमी केले आहे.आणि तेही कुठलाही शॉर्टकट न वापरता .

Continues below advertisement

तमन्नाच्या ट्रेनर सिद्धार्थ सिंग यांनी अलीकडेच तीन सोप्या पण प्रभावी सवयी शेअर केल्या आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी झगडणाऱ्यांना दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात. त्यांच्या मते, सातत्य आणि जीवनशैलीतील बदल हे तात्पुरत्या डाएटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.

वजन कमी करण्याचे 3 सोपे उपाय  

तमन्ना भाटियासोबत जवळून काम करणारे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंगने सांगितलं की, यशस्वी आणि टिकाऊ वजन कमी करण्याचं गमक म्हणजे निरोगी सवयी आत्मसात करणं. त्यांच्या मते, योग्य पद्धतीने काम केल्यास 90 दिवसांत 5 ते 10 किलो वजन कमी करणं शक्य आहे. त्यांचे तीन मुख्य उपाय सोपे आणि कोणालाही पाळता येतील असे आहेत.

Continues below advertisement

1. प्रथिनयुक्त आहार घ्या

प्रत्येक जेवणात प्रथिनाचा (प्रोटीनचा) उत्तम स्रोत असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रथिनयुक्त आहार घेतल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही किंवा अनावश्यक स्नॅक्स खाण्याची सवय कमी होते. तसेच प्रथिनामुळे स्नायू मजबूत राहतात आणि व्यायाम करताना शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. सिद्धार्थ यांच्या मते, प्रथिनावर लक्ष केंद्रित केल्याने भूक नियंत्रणात राहते आणि डाएट पाळणं सोपं होतं.

2. पुरेसं पाणी प्या

सिद्धार्थ यांचा दुसरा सल्ला म्हणजे शरीराला सतत हायड्रेट ठेवा. अनेकदा आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते. म्हणून जेव्हा भूक लागल्यासारखं वाटतं तेव्हा एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे क्रेविंग्स कमी होतात आणि जास्त खाणं टाळता येतं. हायड्रेशन हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतला सर्वात साधा पण शक्तिशाली घटक आहे.

3. नियमित व्यायाम करा

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे नियमित व्यायाम. सिद्धार्थ विनोदी शैलीत “डोन्ट बी अ पोटॅटो” असं म्हणलं. म्हणजे दिवसभर बसून राहू नका. ते मजेशीरपणे बिअर बाटलीचं उदाहरण देतात पण मुद्दा स्पष्ट करतात. शरीर हालचाल करायला हवं! व्यायाम केल्याने केवळ कॅलरी बर्न होत नाही, तर मन प्रसन्न राहतं, आत्मविश्वास वाढतो आणि शरीरात ताजेपणा येतो. दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घरी बसून राहणं हे फिटनेसचं सर्वात मोठं शत्रू ठरू शकतं.

सिद्धार्थ सिंग यांचा स्पष्ट संदेश आहे. “ Don't be a Potato!” म्हणजेच सतत हालचाल करा, पौष्टिक खा, आणि पाण्याचं प्रमाण राखा. हे तीन साधे सवयी जीवनशैलीचा भाग बनवल्यास केवळ वजन कमी होणार नाही, तर शरीरही टोन होईल आणि कपडेही परफेक्ट बसतील.

तमन्नाचा आगामी प्रोजेक्ट कोणता?

तमन्ना भाटियाचं फिटनेस सीक्रेट कुठल्याही महागड्या डाएटमध्ये नाही, तर तिच्या सातत्यपूर्ण सवयींमध्ये आहे. प्रथिनयुक्त आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि नियमित व्यायाम या तिन्ही गोष्टींनी ती आजही फिट आणि ऊर्जावान दिसते. दरम्यान, कामाच्या आघाडीवर तमन्ना भाटिया नुकतीच “Do You Wanna Partner” या डायना पेंटीसोबतच्या सीरिजमध्ये झळकली असून, ही मालिका Amazon Prime Video वर स्ट्रीमिंगला आली आहे. पुढे ती सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या पौराणिक प्रोजेक्ट “Vvan” मध्ये दिसणार आहे.