Skin Care Tips : थंड वाऱ्यामुळे आपली त्वचा (Skin Care Tips) अनेकदा कोरडी होते. या समस्येचा सामना करण्यासाठी, आपण अनेकदा विविध प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतो. पण, एकतर या प्रोडक्ट्समध्ये केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. तसेच, काही काळानंतर आपली त्वचा पुन्हा कोरडी (Dry Skin) पडू लागते. चेहऱ्यावरचा ग्लो कायम ठेवण्यासाठी त्वचेला आतून पोषण मिळणं गरजेचं आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.  


थंडीच्या दिवसांत तसाही आपलया त्वचेवर परिणाम होतो. अशा वेळी काही सुपरफूड्स आहेत जे आपलं थंडीपासून रक्षण आणि त्वचेला ओलावा देण्यास मदत करतात. यामुळे आपली त्वचा हायड्रेट तर राहतेच पण त्याचबरोबर चेहऱ्यावरील सूज आणि एॅलर्जीपासूनही संरक्षण करता येते.  आणि शरीरात कोलेजन तयार होते. या ऋतूत तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर त्वचेच्या काळजीबरोबरच तुम्ही तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.


निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा


1. एवोकॅडो


एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात याचा आहारात नक्की समावेश करा. यामुळे तुमची त्वचा ग्लोइंग तर होईलच शिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहील. एवोकॅडो हे एक प्रकारचे क्रीमयुक्त फळ आहे जे त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्याही दूर होते.


2. रताळे


रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते जे पोषणाचे पॉवर हाऊस मानले जाते. रताळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरात गेल्यानंतर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतात, जे शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.


3. मासे 


मासे खाल्ल्याने त्वचा आतून ग्लो करते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे या ऋतूत तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मनसारख्या फॅटी माशांचा समावेश करावा. या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. त्वचेच्या दुरुस्तीसाठी हे महत्त्वाचे मानले जाते. मासे खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.


4. पालक


पालकामध्ये व्हिटॅमिन ए, सी तसेच लोह मुबलक प्रमाणात आढळते. पालकाचा आहारात समावेश केल्यास त्वचा निरोग राहण्यास मदत होते आणि कोलेजनचे उत्पादनही वाढते. हिवाळ्यात, सॅलाडपासून भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत पालकाचा वापर करावा यामुळे तुमची त्वचा आतून हायड्रेट राहील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका