Skin Care Tips : पुदिना (Mint Leaves) आपल्या आरोग्यासाठी (Health) किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कूलिंग इफेक्टमुळे पुदिना आपले शरीर थंड ठेवते. पुदिन्याचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. जसे की, पुदिन्याची चटणी, कोशिंबीर, कूलिंग ड्रिंक्स, ज्यूस अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पुदिन्याचं सेवन करू शकता. पण, तुम्हाला माहीत आहे का पुदिना फक्त खाण्यासाठीच नाही तर त्याचा त्वचेसाठीही तुम्ही चांगला वापर करू शकता. 


पुदिन्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. त्याचे थंड गुणधर्म चेहऱ्याला थंडावा आणि ताजेपणा देतात. जर तुम्हाला सुद्धा त्वचेशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही घरच्या घरी पुदिन्याचा फेस पॅक देखील बनवू शकता.  


केळी आणि पुदिन्याचा फेस पॅक


हा फेस पॅक बनवण्यासाठी अर्धी केळी घ्या. त्यात 8 ते 10 पुदिन्याची पाने घाला. ते बारीक करून घ्या. हे मिश्रण तयार झाल्यावर, फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर किमान 15 ते 30 मिनिटे लावा. चेहरा सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.


पुदिन्याची पाने आणि गुलाबाच्या पाण्याचे सीरम  


10 ते 12 ताजी पुदिन्याची पाने बारीक करून घ्या. ही पेस्ट काचेच्या डब्यात ठेवा. आता त्यात दोन ते तीन चमचे गुलाबजल, 7 ते 8 थेंब ग्लिसरीन टाकून चांगले मिसळा. ही पेस्ट एक रात्र रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी ते गाळून स्वच्छ डब्यात किंवा काचेच्या बाटलीत ठेवा. अशा प्रकारे तुमचे घरगुती सीरम तयार होईल. दररोज चेहरा धुतल्यानंतर त्याचे काही थेंब टाकून हलक्या हाताने मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने चेहरा धुवा.


तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती आणि पुदिन्याच्या पानांचा फेस पॅक


या फेस पॅकसाठी 1 चमचा मुलतानी मातीमध्ये 10 ते 12 चिरलेली पुदिन्याची पाने, एक चमचा मध, एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. साधारण 20 मिनिटे लावल्यानंतर, आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून किमान दोनदा हा फेस पॅक लावा. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्याला चांगला परिणाम दिसेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?