(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : सुंदर आणि नितळ त्वचेसाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Skin Care Tips : कोलेजन हे प्रथिन आहे. शरीरातील 30 टक्के प्रथिने हे कोलेजनचे बनलेले असते.
Skin Care Tips : सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. यासाठी प्रत्येकजण विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स (Skin Care Tips) वापरतात. मात्र, त्यांना हवा तसा परिणाम दिसत नाही. या सौंदर्य प्रसादनांनी तुमची त्वचा काही काळासाठी नितळ होईल, ग्लो करेल पण याचा फार काळ त्वचेसाठी वापर केल्यास धोकादायक ठरू शकतो. खरंतर, त्वचा आतून तरुण आणि सुंदर असणं गरजेचं आहे यासाठी कोलेजन हे काम करते.
कोलेजन हे प्रथिन आहे. शरीरातील 30 टक्के प्रथिने हे कोलेजनचे बनलेले असते, जे तुमची त्वचा, स्नायू आणि हाडांना आधार, ताकद आणि संरचना प्रदान करते. जसजसे, वय वाढत जाते तसतसे तुमच्या शरीरातील कोलेजन तुटत राहते आणि नवीन कोलेजन बनवण्याची शरीराची प्रवृत्तीही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे तुमच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्वचेचे वृद्धत्व रोखण्यासाठी तुम्ही कोलेजन समृद्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर केला पाहिजे.
अश्वगंधा
अश्वगंधाचा आहारात समावेश करावा. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचे सेवन वृद्धत्वाची लक्षणे टाळण्यास मदत करू शकते.
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे. आवळा शरीरातील कोलेजन पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतो. हे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे निर्माण होतात. त्वचेला ग्लो बनवण्याबरोबरच खराब झालेल्या त्वचेची काळजी करते. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात. पण, Ursolic Acid, Rosmarinic Acid आणि Eugenol हे त्यातील सर्वात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहेत त्यात मुक्त रॅडिकल्सशी लढण्याची ताकद आहे. याच्या सेवनाने त्वचेतील कोलेजन वाढते.
तूप
तुपात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे ए, डी आणि ई असतात, जे निरोगी त्वचेसाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन ए कोलेस्टेरॉलच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. यामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर बनते. त्यात जीवनसत्त्वे असतात, जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात आणि अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करतात.
ब्राह्मी
ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत जे पेशी सुधारतात आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात. हे औषधी आणि आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमध्ये वापरले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :