Skin Care: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे अतिसेवन आणि व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे तरुण पिढीला विविध शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतोय. तरुण वयात तशी चेहऱ्यावर चमक असते, पण आजकाल तरुणाईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि सैलपणा पाहायला मिळत आहे. नवीन पिढीतील लोक या समस्येने खूप त्रस्त आहेत, परंतु आता वृंदावनचे महाराज प्रेमानंद (Premanand Maharaj) यांनी या समस्येवर उपाय आणि समाधान दोन्ही सांगितले आहेत.


 


महाराजांनी सांगितलेला उपाय जर कोणी एक वर्ष फॉलो केला तर...


वृंदावनचे महाराज प्रेमानंद हे त्यांनी दिलेल्या टिप्समुळे अनेकदा चर्चेत असतात, त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्याही काही कमी नाही, प्रत्येक भक्त आपल्या विविध समस्यांचं समाधान शोधण्यासाठी त्यांच्यासाठी येतो. त्यावेळी प्रेमानंद महाराज हे भक्तांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देतात. असं म्हणतात की, महाराजांनी सांगितलेला उपाय जर कोणी एक वर्ष फॉलो केला तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तो वर्षभरातच सुंदर दिसू लागेल. प्रेमानंद महाराज म्हणाले की, शरीरासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकाच आहारही आहे. तरुणांनी व्यायाम करावा. व्यायामाने शरीर आणि बुद्धी या दोन्हींचा विकास होतो.


 


आजच्या पिढीच्या शरीरात आता ताकद राहिली नाही - प्रेमानंद महाराज


महाराज पुढे म्हणाले, आजच्या तरुणांना व्यायाम, योग्य आहार अशा अनेक सकारात्मक गोष्टींसाठी वेळ नाही का? सकाळी उशिरा उठून घाणेरड्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणाऱ्या आजच्या पिढीच्या शरीरात आता ताकद राहिली नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. यावर महाराजांनी तरुणांना रोज 20 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला. 20 मिनिटांचा हा व्यायाम तुमच्या आयुष्यात वरदान ठरेल. तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटेल आणि सुंदर दिसाल.


 


'पूर्वी मीही रोज व्यायाम करायचो', महाराज म्हणाले...


महाराज म्हणाले, पूर्वी मीही रोज व्यायाम करायचो, पण किडनी निकामी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला व्यायाम न करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी त्यामागचे कारण सांगितले की, तुमची किडनी सुजली असून तुम्ही व्यायाम केलात तर ती फुटतील.


 


हेही वाचा>>>


Relationship : 'माझा मुलगा एका विवाहित महिलेसोबत राहतोय, लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितली 'अंदर की बात!'


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )