Navratri 6th Day 2023 : शारदीय नवरात्रीमध्ये (Shardiya Navratri 2023) आज षष्ठीची पूजा केली जाणार असून देवी कात्यायनी (Goddess Katyayani) हे देवी दुर्गेचे सहावे रूप आहे. विड्याचे पान कात्यायनी मातेला अत्यंत प्रिय मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीच्या दिवशी विड्याच्या पानांचे काही उपाय केल्याने माता कात्यायनी तुमची सर्व संकटे दूर करतात. विड्याच्या पानांचे उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळते. अविवाहित मुलींनी नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाचे उपाय केल्यास त्यांना इच्छित जोडादार मिळतो, असेही मानले जाते. जाणून घ्या विड्याच्या पानाचे काही खास उपाय.


 


आर्थिक संकटावर मात करण्यासाठी 



नवरात्रीच्या षष्ठीच्या दिवशी 5 विड्याची पाने घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. 
त्यानंतर सर्व विड्याच्या पानांवर माँ दुर्गेचा बीज मंत्र लिहा - ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे आणि दुर्गेच्या चरणी अर्पण करा.
दुसऱ्या दिवशी ही विड्याची पाने लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या पेटीत ठेवा. 
त्यानंतर पुढील नवरात्रात पाण्यात विसर्जित करा.



धनप्राप्तीच्या आशीर्वादासाठी उपाय


नवरात्रीच्या सहाव्या दिवशी धनप्राप्तीसाठी विड्याच्या पानांचा हा उपाय करा. सुपारीच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि देवी दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढतो, त्याच बरोबर तुम्ही पैसे वाचवू शकता, तुमची समृद्धी वाढते.



लवकर लग्नासाठी उपाय


जर तुमच्या घरात विवाहयोग्य मुलगी- मुलगा असेल, त्यांच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील तर देवी कात्यायनीची पूजा करून विड्याच्या पानांचा हा उपाय करून पाहा. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी 11 विड्याची पाने घेऊन त्यावर हळद लावावी. देवी कात्यायनीला एक एक करून ती अर्पण करावी. विड्याची पाने अर्पण करताना, देवी दुर्गेच्या बीज मंत्राचा जप करत राहा, ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे, असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते.


 


घरातील कलह संपवण्यासाठी.. 


पती-पत्नीमध्ये अनेकदा कलह आणि भांडण होत असेल, तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी विड्याच्या पानावर कुंकू लावून ते देवी दुर्गाला अर्पण करावे. नंतर प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटून घ्या. असे केल्याने परस्पर प्रेम तसेच स्नेह वाढेल.


 


शनिवारी हे उपाय करा


नवरात्रीच्या शेवटच्या शनिवारी 5 विड्याच्या पानांवर सिंदूराने जय श्री राम लिहा, ही पाने हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरी-व्यवसायात येणारी प्रत्येक समस्या दूर होऊन तुमची प्रगती होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Navratri 6th Day : वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा आशीर्वाद देणारी देवी कात्यायनी! नवरात्रीच्या 6 व्या दिवशी 'अशी' पूजा करा, जाणून घ्या