Shani Dev : हिंदू धर्मात (Hindu Religion) शनिवार (Saturday) हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. ज्यांना एखादे विशेष कार्य सिद्धी करायचे असेल, त्यांनी शनिवारी उपवास करून शनिदेवाची पूजा करावी. शास्त्रामध्ये शनिदेवाला कर्मफळ देणारे मानले जाते जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. (Religion News)


शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय


शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी दशरथाने लिहिलेल्या शनिस्तोत्राचे पठण करणे चांगले मानले जाते. शनिदेवाच्या पूजेमध्ये याचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की, राजा दशरथ लिखित शनि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. याचे पठण केल्याने शनि साडेसाती आणि ढैय्याचा प्रभावही कमी होतो.



दशरथकृत शनि स्तोत्र


दशरथ उवाच:
प्रसन्नो यदि मे सौरे ! एकश्चास्तु वरः परः ॥
रोहिणीं भेदयित्वा तु न गन्तव्यं कदाचन् .
सरितः सागरा यावद्यावच्चन्द्रार्कमेदिनी ॥
याचितं तु महासौरे ! नऽन्यमिच्छाम्यहं .
एवमस्तुशनिप्रोक्तं वरलब्ध्वा तु शाश्वतम् ॥
प्राप्यैवं तु वरं राजा कृतकृत्योऽभवत्तदा .
पुनरेवाऽब्रवीत्तुष्टो वरं वरम् सुव्रत ॥
दशरथकृत शनि स्तोत्र:
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च .
नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम: ॥1॥
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च .
नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते ॥2॥
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम: .
नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते ॥3॥
नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम: .
नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने ॥4॥
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते .
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च ॥5॥
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते .
नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते ॥6॥
तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च .
नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम: ॥7॥
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे .
तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् ॥8॥
देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा: .
त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत: ॥9॥
प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे .
एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल: ॥10॥


दशरथ उवाच:
प्रसन्नो यदि मे सौरे ! वरं देहि ममेप्सितम् .
अद्य प्रभृति-पिंगाक्ष ! पीडा देया न कस्यचित् ॥


 


शनीची साडेसाती टाळण्याचे उपाय
शनीची साडेसाती टाळण्यासाठी शनिवारी ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते. या मंत्राचा दररोज जप केल्याने शनीच्या साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते. शनिदेवाला काळे तीळ खूप आवडतात. शनिवारी काळे तीळ दान केल्याने शनीची महादशा आणि साडेसातीपासून आराम मिळतो, असे मानले जाते. नीलम रत्न धारण केल्याने शनि ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो. शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या महादशापासून मुक्ती मिळते. शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे हा देखील साडेसतीचा अशुभ प्रभाव दूर करण्याचा निश्चित उपाय मानला जातो. हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनीच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Shani Amavasya 2023: शनिश्चरी अमावस्या 'या' महिन्यात कधी आहे? पितरांसोबतच शनिदेवाची कृपाही होईल! जाणून घ्या