Relationship Tips : असे अनेक जण म्हणतात की, आजच्या व्यस्त जीवनात एकमेकांसाठी कुठे वेळ आहे? करिअर घडविताना सकाळी जे घरातून बाहेर पडतो. तेच रात्री घरी परततो, मग नात्यासाठी वेळ काढायचा कसा? असा अनेकांना प्रश्न पडतो. आजकाल सकाळी 9 ते रात्री 9 ही जीवनशैली अगदी सामान्य झाली आहे. या जीवनशैलीमुळे लोकांचे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनावरही (Married Life) विपरीत परिणाम होत आहेत. एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी वेळेअभावी नात्यात कुठेतरी ठिणगी पडतेच. बऱ्याच वेळा, करिअरमुळे, लोक त्यांच्या जोडीदारांना आवश्यक लक्ष देऊ शकत नाहीत. खरं पाहता, जेव्हा लोक बरेच तास काम करून घरी परततात तेव्हा त्यांच्या जोडीदारासाठी वेळ नसतो.
जेव्हा नात्यात एकमेकांसाठी कमी वेळ नसतो तेव्हा...
जेव्हा नात्यात एकमेकांसाठी कमी वेळ नसतो तेव्हा तुम्ही नाखूष राहता आणि तुम्हाला खूप तणावाचाही सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नात्यात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकवून ठेवू शकता.
प्रेमात पुन्हा गोडवा कसा आणायचा?
तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कनेक्ट राहू शकता. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. जरी वेळ कमी असला तरी जो काही वेळ मिळालाय, त्या वेळेत तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये कोणीही नसावे. यावेळी, तुमचे फोन दूर ठेवा आणि एकमेकांवर लक्ष केंद्रित करा.
नात्यात काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक
दिवसभर तुम्ही व्यस्त असता पण तुमच्या नात्यातील काही गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे, जसे की सकाळी एकत्र चहा पिणे किंवा फिरायला जाणे. या छोट्या सवयी तुम्हाला एकमेकांच्या जवळ राहण्यास मदत करतील.
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप बाजूला ठेवा
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कितीही वेळ घालवला तरी या काळात मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप इत्यादी गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक आणि मानसिकरित्या उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.
मिनी ब्रेक आवश्यक
तुमच्या जोडीदारासोबत हँग आउट करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. तुमच्या पार्टनर सोबत शनिवार किंवा एखादा रविवार लांब सुट्टीच्या दिवशी एक लहान सहलीची योजना करू शकता. यामुळे तुम्हाला एकमेकांशी जोडलेले वाटेल.
रात्री झोपण्यापूर्वी बोला
रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी बोला. तुमचा दिवस कसा होता आणि दिवसभर तुमचे काय झाले ते एकमेकांना सांगा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Relationship Tips : हो... तुम्ही निवडलेला जोडीदार तुमच्यासाठी Perfect! 'हे' संकेत जाणून घ्या, तुम्ही एका परिपूर्ण व्यक्तीला डेट करत आहात