Relationship Tips : आयुष्यात उत्तम जोडीदार आला की जीवनाचं सार्थक होतं असं म्हटलं जातं. आजकालच्या जगात समजून घेणारा जोडीदार मिळणे तसे अशक्यच असते. चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य म्हणजे आदर, विश्वास आणि चांगल्या आणि वाईट काळात ढाल म्हणून उभे राहणे. पण अनेकवेळा आपण प्रेमात इतके आंधळे होतो, ज्यामुळे आपण आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे भविष्यात नाते बिघडते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या नात्यात सहन करू नये.
जोडीदाराच्या 'या' गोष्टी अजिबात सहन करू नका
नात्यात वारंवार होणारे भावनिक आणि शारीरिक शोषण तुम्ही सहन करू नये. तुम्ही तुमच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा अनादर सहन करू नये.
जर तुमचा जोडीदार तुमच्या भावना मान्य करण्यात अयशस्वी ठरला आणि अनेकदा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा नात्याचे भविष्य नाही.
नात्यात जोडीदाराची फसवणूक अजिबात सहन करू नये. हेराफेरी करणाऱ्या व्यक्तीसोबत रोमँटिक नातेसंबंधात असणे भावनिकदृष्ट्या निचरा होऊ शकते.
फसवणूक करणाऱ्या जोडीदाराचे लक्षण हे आहे की असा तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, तुम्हाला मदत करणार नाही, पण नेहमी तुमची मदत मागतो. हे देखील एक संकेत आहे की तो या नात्याबद्दल गंभीर नाही.
आपल्या जोडीदाराला मदत करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतु त्यांच्याकडून कोणतीही मदत न मिळणे चुकीचे आहे.
जर तुमच्या जोडीदाराचे वागणे तुमच्यासोबत योग्य नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
तुमच्या दोघांमध्ये कितीही प्रेम असलं तरी समोरच्या व्यक्तीचं वागणं तुमच्यासाठी चांगलं नसेल तर केवळ प्रेमामुळे नात्याची गाडी पुढे नेणं चुकीचे ठरते.
तुमचा पार्टनर किती भावनिक महत्त्व देतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याशी निगडीत समस्या त्याच्यासोबत शेअर करता तेव्हा तुमचा जोडीदार दुर्लक्ष करत असेल तर समजून जा त्याला गरज राहिलेली नाही.
जर तुमचा जोडीदार तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर जे तुम्ही अजिबात सहन करू नये.
कुठे जायचे, कोणाला भेटायचे, कसे कपडे घालायचे, हे सगळे निर्णय आपल्या अखत्यारित नसतील तर ते योग्य नाही. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही तुमचे आयुष्य अशाच कोणासोबत घालवण्याचा विचार करत असाल तर एकदा नीट विचार करा.
जर तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रत्येक मुद्द्यावर टीका करत असेल, तर हे वर्तन नातेसंबंधासाठी खूप विषारी आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :