Relationship Tips : प्रेमात (Love Relation) सगळं काही चांगलं सुरू असतानाच अशी एक वेळ येते, जेव्हा वाटू लागतं की आता हे नातं हळूहळू ब्रेकअपकडे (Break Up) जातंय. सुरुवातीच्या काळात, जोडप्यांमध्ये सर्वकाही ठीक आणि गोड-गोड असते. प्रेमाच्या आकंतात दोघे जण पार बुडालेले असतात. मात्र एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्या नंतर अनेकदा गैरसमजांमुळे नात्यात कटु परिस्थिती निर्माण होते. ज्यामुळे हे नाते हळूहळू ब्रेकअप म्हणजेच तुटण्यावर येते. अशा वेळी जोडीदारांनी वेळेपूर्वीच सावध होण्याची गरज आहे. 


गैरसमज योग्य वेळी संपवले नाही तर..


काही जोडपे तर असे दिसतात, जणू भविष्यात त्यांच्या नात्यात दुरावा येईल असा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. मात्र, कधी कधी गैरसमजातून अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. जर जोडप्यांनी त्यांच्यातील हे गैरसमज योग्य वेळी संपवले नाहीत तर नातं टोकाला पोहोचते. तसं तर, कोणतंही नातं अचानक संपत नाही. त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात. ही लक्षणे लक्षात घेऊन तुम्हीही तुमचे नाते संपुष्टात येण्यापासून वाचवू शकता.


जोडीदाराला स्वातंत्र्य द्या


जर तुम्हाला तुमचे नाते चांगले टिकवायचे असेल तर तुमच्या जोडीदाराला स्वातंत्र्य द्या, त्यांच्या निर्णयात अधिक हस्तक्षेप करणं टाळा. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची जास्त काळजी घेत असाल आणि प्रत्येक गोष्टीत त्याला अडवायला सुरुवात केली असेल, तर समजून घ्या की हे तुमच्या नात्यासाठी धोक्याचे लक्षण आहे. ही सवय वेळीच सुधारून तुम्ही तुमचे नाते वाचवू शकता.


जोडीदाराची परिस्थिती समजून घ्या


जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेऊ शकत नसाल तर तुमच्या नात्यासाठी हे धोक्याचे लक्षण आहे. एक आदर्श जोडीदार तो असतो जो आपल्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करतो. जर तुम्ही असे करत नसाल तर तुमची सवय बदला अन्यथा तुमचे नाते ब्रेकअपकडे जाऊ शकते.


संवाद साधला नाही तर...


जर तुमचा तुमच्या जोडीदाराशी संवाद चांगला नसेल तर तुमच्या नात्यात गैरसमज आणि भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. जोडीदाराशी सतत संवादात रहा. तुमचे मत थेट आणि स्पष्टपणे सांगा, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करण्यास लाजाळू असाल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगले नाही.


स्वार्थी असणे ही नात्यातील सर्वात वाईट गोष्ट 


कोणत्याही नात्यासाठी सर्वात वाईट दृष्टीकोन म्हणजे स्वार्थी असणे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणि त्याच्या ध्येयांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या आवडीनिवडींना जास्त महत्त्व दिले तर तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते. खरं तर. तुमची अपेक्षा असते की तुमचा जोडीदार तुम्हाला अत्यंत महत्त्व देईल, पण प्रतिसादात तुम्ही तसे करत नाही, ही तुमच्या नात्यासाठी धोक्याची घंटा आहे.


...यामुळेही तुमचे नाते तुटू शकते


संबंध तुटण्यामागे मत्सर, ईर्श्या हे मुख्य कारण आहे. तुमच्या जोडीदाराच्या यशाबद्दल ऐकून तुम्ही अस्वस्थ आणि काळजीत असाल तर तुमचे नाते धोक्यात आल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : बचके रहना रे बाबा..! 'या' 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवा; मानसिक आरोग्यावर करतात वाईट परिणाम