Relationship Tips : असं म्हणतात ना, प्रेमाचा धागा खूप नाजूक असतो, तसेच तो विश्वासाने बांधलेला असतो. जर नात्यात कोणत्याही प्रकारचा संशय, राग, अविश्वास यासारख्या काही गोष्टी आल्या, तर हा धागा तुटायला फार वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला 'इमोशनल डंपिंग'बाबत सांगणार आहोत. मानसशास्त्रज्ञ याला एक प्रकारचा मानसिक छळ सांगतात. जर तुमचाही जोडीदार तुमच्यासोबत अशा काही विचित्र पद्धतीने वागत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे, जाणून घेऊया सविस्तर


 


 



जोडीदार इतर गोष्टींचा राग तुमच्यावर काढतोय?


राग आतून दाबून ठेवणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईट आहे, परंतु तो सोडवून शांत करण्याचा एक मार्ग आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. जर तुम्ही घरी येऊन तुमच्या ऑफिसमधील निराशा तुमच्या जोडीदारावर काढत असाल तर हा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे. मानसशास्त्राच्या भाषेत याला इमोशनल डंपिंग म्हणतात. यामुळे तुमचे चांगले नाते बिघडू शकते. कामावरून परतल्यानंतर जोडीदाराला वाटते की आपण त्याच्याशी प्रेमाने बोलावे. तर, नेमके उलटे केले तर तो एक प्रकारचा मानसिक छळ आहे.


 


इमोशनल डंपिंग म्हणजे काय?


नातं म्हटलं तर ही एक अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे, अनेक वेळा जोडीदाराची वागणूक अशी असते की त्यामागचे कारण समजू शकत नाही. यात विनाकारण आरडाओरडा करणे, रागावणे आणि भांडणे देखील समाविष्ट आहेत. रिलेशनशिप तज्ज्ञ अशा प्रकारच्या वागणुकीला इमोशनल डंपिंग म्हणतात, जे तुमचं नातं तुटण्याचं कारण बनू शकतं. इमोशनल डंपिंग म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्या. ऑफिस किंवा कॉलेजमध्ये तुमचा दिवस खूप वाईट होता. याबद्दल तुमच्या आत खूप राग आहे, परंतु तुम्हाला इच्छा असूनही ते व्यक्त करता येत नाही. जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी पोहोचता आणि तुमचा जोडीदार सामान्यपणे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तुमचा राग काढण्यासाठी सॉफ्ट टार्गेट असल्यासारखे वाटते. तुम्ही तुमच्या सर्व निराशा, तक्रारी आणि काळजीने त्याच्यावर ओझे टाकण्याचा प्रयत्न करता.



हे संकत आहेत इमोशनल डंपिंगचे 


जोडीदाराला पाहिल्यानंतर तणाव जाणवतो
जर तुमचे नाते चांगले चालले असेल, तर तुमच्या जोडीदाराला पाहून आणि त्याला भेटल्याने एक वेगळाच आनंद मिळतो, 
पण जर तुमचा जोडीदार घरी येताच वेगळ्या प्रकारचा तणाव दिसू लागला तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.


 


आदराचा अभाव


जर तुमचा पार्टनर तुम्हाला भावनिक ताण देत असेल आणि तुमचा आदर करत नसेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. असे लोक आपला राग काढण्यासाठी आणि रडण्यासाठी फक्त तुमचा खांदा शोधतील. तसेच आनंदाच्या आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्हाला त्यांची अजिबात आठवण होणार नाही.


 


जोडीदाराला काही फरक पडत नाहीत


इमोशनल डंपिंगमध्ये, तुम्हाला काय वाटते याचा समोरच्या व्यक्तीला फरक पडत नाही. त्यांची निराशा बाहेर काढणे हे त्याचे लक्ष्य आहे. नातं वाचवण्यासाठी अनावश्यक भांडणे आणि वाद टाळले तर समोरच्या व्यक्तीला अधिक धैर्य मिळते. तुमच्या जोडीदारालाही अशा सवयी असतील तर त्याच्यासोबत बसून बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञांची मदत देखील घेऊ शकता.


 


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : जीवनात कोणाच्याही आधाराशिवाय आनंदी राहायचंय? या 5 गोष्टींचा अवलंब करा, कशाचीही गरज भासणार नाही


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )