Relationship Tips : असं म्हणतात ना, प्रेमाचा धागा हा अत्यंत नाजूक असतो. कारण नातं हे विश्वासाच्या आधारावर उभं असतं. मात्र आजकाल बदलत्या काळानुसार नात्याचे महत्त्व कमी होतानाचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नाती सहज तुटत आहेत. नात्यात अहंकार आल्याने आजकाल तडजोड करायला कोणीही तयार होत नाही. आप अनेकदा ऐकतो, आजकाल नात्यात ब्रेकअपच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे, तुम्हाला वेळ देत नाही किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आता तुम्हाला रिलेशनशिपची कमान तुमच्या हातात घेण्याची गरज आहे.
नातं तुटायला लागलं की, एकमेकांचे चांगले गुणही वाईट वाटायला लागतात
अगदी घट्ट आणि वर्षानुवर्षे जुने नातंही तुटायला लागलं की एकमेकांचे चांगले गुणही वाईट वाटायला लागतात. कोणतंही नातं टिकवायचं असेल तर त्यामध्ये मेंदूपेक्षा जास्त ह्रदयाचा वापर करावा लागतो. यासाठी रिलेशनशिपमध्ये असलेल्या दोघांनाही आपली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडावी लागते. नात्यात अप्रामाणिकपणा मिसळला की ते नातं बिघडायला लागते. तुटलेले नाते पुन्हा कसे उभारायचे ते जाणून घ्या.
गैरसमज
नात्यात बराच वेळ एकत्र घालवताना गैरसमज होणे सामान्य आहे. पण जर ते वेळेवर संपले नाहीत तर ते नाते तुटण्याचे सर्वात मोठे कारण ठरते. जर तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. यामुळे भांडणाचे कारण कळेल आणि ते सुधारण्यासही मदत होईल.
वैयक्तिक स्पेस
कोणी कितीही जवळचे असले तरी त्यांना वैयक्तिक स्पेस हवी असते. प्रत्येकाच्या स्वतःच्या आवडी-निवडी, मित्र आणि नातेवाईक असतात. एकमेकांमध्ये खूप भांडण किंवा वाद होत असतील तर काही काळ एकमेकांना स्पेस द्या. यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला मिस करेल आणि नातं सुधारण्याचा प्रयत्न करू लागेल.
स्वतःच्या चुका मान्य करणं महत्वाचं
भांडणाच्या वेळीच जोडीदाराला दोष देऊ नका. शांत झाल्यावर तुमच्या चुका समजून घ्या. तसेच जोडीदारासमोर तुमची चूक मान्य करा. तुमच्या जोडीदारासमोर तुमची चूक मान्य केल्याने तुम्ही लहान होणार नाही, उलट नातं आणखी घट्ट होण्यास मदत होईल, हे लक्षात ठेवा.
एकमेकांना आधार द्या
तुम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यावर एकमेकांना साथ देण्याचे वचन देता. ब्रेकअप किंवा घटस्फोट रोखायचा असेल तर एकमेकांना आधार द्या, एकमेकांना महत्त्व द्या. तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी जाणवून द्या की तो तुमच्यासाठी खास आहे. यासाठी जर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील तर अजिबात संकोच करू नका.
हेही वाचा>>>
Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )