मुंबई : अवघ्या काही दिवसांनीच 2020 हे वर्ष सरणार आहे. महामारी, पूर, अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ, आर्खिक संकट अशा अनेक आव्हानांचा सामना करतानाच अखेर हे खडतर वर्ष संपण्याच्या मार्गावर आलं आहे. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं अनेकांच्या जीवनाची घडी विस्कटली. काहींना नोकरीला मुकावं लागलं, तर काही मंडळींच्या सहलींचे बेत रद्द झाले.
सातत्यानं लावली जाणारी टाळेबंदी आणि त्यामुळं पर्यटन स्थळं किंवा आणखीही ठिकाणी ये- जा करण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध या साऱ्यामुळं अनेकांची चीडचीडही झाली. पण, आता परिस्थिती सुधारत असतानाच एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. ही बाब म्हणजे पुढील वर्षातील आनंद पर्वाची.
येणारं वर्ष हे अतिशय सकात्मक आणि तितकंच आनंददायी असेल या आशेसह आतापासूनच 2021 मधील सुट्ट्यांचे बेत आखले जात आहेत. चला तर मग, तुम्हीही या सुट्ट्यांच्या यादीवर एक नजर टाका. जेणेकरुन वीकेंडचे बेत आखणं तुम्हालाही सोपं जाईल.
2021 मध्ये येणाऱ्या वीकेंड आणि काही महत्त्वाच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणं....
जानेवारी
1 जानेवारी, शुक्रवार – नववर्ष
14 जानेवारी, गुरुवार – मकर संक्रांत, पोंगल
26 जानेवारी, मंगळवार – प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी
16 फेब्रुवारी, मंगळवार – वसंत पंचमी
19 फेब्रुवारी, शुक्रवार – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च
11 मार्च, गुरुवार- महाशिवरात्री
29 मार्च, सोमवार – धुलिवंदन
एप्रिल
2 एप्रिल, शुक्रवार – गुडफ्रायडे
13 एप्रिल, मंगळवार - गुढीपाडवा
14 एप्रिल, बुधवार – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे
14 मे, शुक्रवार – अक्षय तृतीया, ईद-उल-फित्र
26 मे, बुधवार – बुद्धपौर्णिमा
जून महिन्यात असा कोणताही वीकेंड किंवा सहजासहजी सुट्टी मिळेल असा दिवस आल्याचं दिसत नाही.
जुलै
21 जुलै, बुधवार – बकरी ईद
ऑगस्ट
16 ऑगस्ट, सोमवार - पारसी नववर्ष
19 ऑगस्ट, गुरुवार- मोहरम
30 ऑगस्ट, सोमवार- श्रीकृष्ण जन्माष्टमी
31 ऑगस्ट, मंगळवार – गोपाळकाला
सप्टेंबर
10 सप्टेंबर, शुक्रवार – श्रीगणेश चतुर्थी
ऑक्टोबर
15 ऑक्टोबर, शुक्रवार – दसरा
19 ऑक्टोबर, मंगळवार- ईद-ए-मिलाद
नोव्हेंबर
4 नोव्हेंबर, गुरुवार- नरक चतुर्दशी
5- नोव्हेंबर, शुक्रवार – दिवाळी पाडवा
19 नोव्हेंबर, शुक्रवार – गुरुनानक जयंती
डिसेंबर
31 डिसेंबर, शुक्रवार – वर्षअखेर
Health Tips : ब्रेकफास्ट टाळण्यापूर्वी हे नक्की वाचा; कारण....
पुढील वर्षी काही सण-वार शनिवारी आले आहेत. त्यामुळं ते दिवसही धरुन तुम्ही सुट्टीचा बेत आखू शकता. आठवड्याच्या मध्येच आलेल्या सुट्टीच्या दिवसांना जोडूनही एखादी मोठी सहल तुम्ही ठरवू शकता. तेव्हा नव्या जोमानं नव्या वर्षाचं स्वागत करत नवनवीन बेत आखायला विसरु नका.