Places to celebrate New Year in India 2022 : 31 डिसेंबर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात. काही कुठेतरी डेस्टिनेशन ठिकाणी फिरायला जातात. तर काही घरीच मित्र-मंडळी, कुटुंबियांबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करतात. अशा वेळी तुम्हाला देखील यंदाचं नवीन वर्ष जरा हटके पद्धतीने साजरा करायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणं घेऊन आलो आहोत. या ठिकाणचं निसर्गसौंदर्य आणि नाविण्यपूर्ण वातावरण नक्कीच तुम्हाला आकर्षित करेल.
1. गोवा : रात्री उशिरा होणारे उत्सव, समुद्रकिनाऱ्यावरील फटाके, संगीत, नयनरम्य सुमद्र आणि आनंददायी संध्याकाळ जर तुम्हाला सेलिब्रेट करायची असेल तर गोवाशिवाय दुसरं कोणतं ठिकाण नाही. गोवा हे ठिकाण नवीन वर्ष साजरा करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तसेच, या दरम्यान गोव्यात अनेक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
2. उदयपूर, राजस्थान : पिंक सिटी म्हणून राजस्थानची ओळख आहे. राजस्थान हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जे हिवाळ्यात अतिशय आनंद देणारं ठिकाण आहे. राजस्थानच्या वाळूत फिरताना, थंडगार वातावरण आणि मोठमोठे महाल पाहण्यासाठी या सीझनमध्ये राजस्थानला जाण्यासारखा दुसरा आनंद नाही.
3. केरळ : केरळचा मोहक छोटा प्रांत नवीन वर्ष साजरा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. केरळमध्ये, अनेक डीजे पार्टी आयोजित केल्या जातात. छान असं संगीतमय वातावरण अनुभवायला मिळतं. ज्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच, केरळमधील निसर्गसौंदर्य नक्कीच तुम्हाला आनंद देणारं आहे.
4. कोची, केरळ : कोचीमध्ये सांताक्लॉजच्या विशाल पुतळ्याचे दहन करून नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्याची प्रथा आहे. पोर्तुगीज नवीन वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून पोर्तुगीजांनी भारतात त्यांचा पहिला तळ कोची येथे स्थापन केला तेव्हा सुरू झालेला 500 वर्ष जुना विधी पप्पंजी जाळणे, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवाच्या समारोपाचे प्रतीक आहे. दरवर्षी, साधारणपणे फोर्ट कोची येथे आयोजित केलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील उत्सवांना सुमारे एक लाख लोक उपस्थित असतात.
5. बेंगळुरू, कर्नाटक : बेंगळुरू हा परिसर केवळ सुसज्ज आहे असे नाही, तर स्थानिकांना विशेष प्रसंगी भव्य पद्धतीने कसे साजरे करावे हे देखील माहित आहे. बंगलोरच्या बाहेरील बाजूस, सकलेशपूर सारखी बरीच लहान शहरे आणि गावे आहेत, काही खूप दूर आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथे येण्यासाठी आणि इतर अनेक लोकांप्रमाणेच मजा करण्यासाठी बेंगळुरु तुमचे स्वागत करत आहे.
6. मुंबई, महाराष्ट्र : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतात फिरण्यासाठी मुंबई सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक लोक मुंबईत येतात. गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, बॅंड स्टॅंड, जुहू बीच अशी कितीतरी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकता.
महत्वाच्या बातम्या :