Healty body BMI Index: आपलं वजन योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी बहुतेक जण बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढतात. डॉक्टरही सुरुवातीला बीएमआय (BMI) तपासतात. पण फक्त बीएमआय पाहून एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी (Healthy) आहे की नाही, हे ठरवता येत नाही. कारण बीएमआय हे केवळ तुमची उंची आणि वजन यावर आधारित असतं. शरीरात किती चरबी आहे, ती कुठे साठली आहे किंवा स्नायू किती आहेत, याची माहिती बीएमआयमधून मिळत नाही. (Health news)

Continues below advertisement

याउलट, कंबरेचा आणि नितंबाचा घेर मोजून काढले जाणारे Waist-to-Hip Ratio (कंबर-नितंब गुणोत्तर) हे मोजल्याने शरीरात चरबी कुठे साठली आहे, याची कल्पना देते. विशेषतः पोटाभोवती साठलेली चरबी आरोग्यासाठी अधिक धोकादायक मानली जाते. पोटाच्या आत अवयवांभोवती साठणाऱ्या चरबीला ‘व्हिसरल फॅट’ म्हणतात. ही चरबी दिसत नसली, तरी ती शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर, पीसीओएस, स्लीप ॲप्निया आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

काही लोक दिसायला सडपातळ असतात आणि त्यांचा बीएमआय देखील सामान्य असतो, पण त्यांच्या पोटाभोवती चरबी जास्त असल्यामुळे त्यांना आरोग्याचे धोके असू शकतात. यालाच “Thin Outside, Fat Inside ” असे म्हणतात. म्हणजे बाहेरून बारीक, पण शरीराच्या आत चरबी जास्त. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीचा BMI जास्त असला, तरी त्याच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण अधिक असल्यास तो तुलनेने निरोगी असू शकतो. म्हणूनच आजकाल डॉक्टर केवळ बीएमआयवर अवलंबून राहत नाहीत. बीएमआय सोबत कंबरेचा घेर, कंबर-नितंब गुणोत्तर, शरीरातील चरबीचे प्रमाण आणि इतर आरोग्य समस्या यांचाही विचार केला जातो.

Continues below advertisement

 Waist-to-hip ratio: कंबर-नितंब गुणोत्तर कसा मोजावे? (Waist to Hip Ratio Matters More for Your Health)

* महिलांसाठी: कंबरेचा घेर ÷ नितंबाचा घेर = 0.85 पेक्षा कमी असणे चांगले.* पुरुषांसाठी: कंबरेचा घेर ÷ नितंबाचा घेर = 0.90 पेक्षा कमी असणे चांगले.

उदाहरणार्थ, एखाद्या महिलेच्या कंबरेचा घेर 80 सेंमी आणि नितंबाचा घेर 100 सेंमी असेल, तर तिचे कंबर-नितंब गुणोत्तर 0.80 येतो, जे सामान्य मानले जाते.

लठ्ठपणावर उपचार करण्याचा उद्देश केवळ वजन कमी करणे हा नसतो. शरीरातील धोकादायक चरबी कमी करणे, जीवनशैलीत सुधारणा करणे आणि भविष्यातील आजारांचा धोका कमी करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, वजन काट्यावर दिसणारा आकडा हा तुमच्या आरोग्याचा आरसा नसतो. तुमच्या शरीरात चरबी कुठे साठली आहे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

डॉ. अपर्णा गोविल भास्कर,येथील लॅप्रोस्कोपिक व बॅरियाट्रिक सर्जन, मेटाहील क्लिनिक, मुंबई

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार