Mental Health : माणसाचं कसं असतं ना.. की आपण आपल्या जीवनात कधी कधी इतका नकारात्मक विचार करतो की, ज्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर तर होतोच, सोबत आपलं शरीर आणि मानसिक आरोग्यावरही हा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही खूप नकारात्मक विचार केला तर तुमचे शरीरही चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागते. यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा धोका असू शकतो. दीर्घकाळ नकारात्मक विचार केल्यामुळे तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात? तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.


 


मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा थेट संबंध


तुम्ही जर मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त नसते. त्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा थेट संबंध आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, कोणत्याही व्यक्तीला तणावाच्या काळात जास्त थकवा जाणवतो. जर नकारात्मक विचार येत असतील तर तुम्ही लवकरच आजारी पडू शकाल. आयुर्वेदिक डॉक्टर आणि पोषण आणि आहार सल्लागार डॉ. ईशा नेगी यांच्या मते, नकारात्मक विचारांमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्याच वेळी, तुम्ही सकारात्मक विचार करत राहिल्यास, तुम्ही अधिक सक्रिय राहाल. डॉक्टर ईशा नेगी यांनीही याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नकारात्मक विचारसरणीमुळे कोणकोणत्या आजारांचा धोका असतो ते जाणून घेऊया.


 


डॉक्टरांचा  व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर



हृदयाशी संबंधित आजार - तज्ज्ञांच्या मते, जास्त नकारात्मक विचार केल्याने तणाव आणि चिंता वाढते. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे संतुलन बिघडते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि जलद हृदयाचे ठोके यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.


 


गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर - डॉ. ईशा नेगी म्हणतात की, अति नकारात्मक विचारांचाही आतड्यांवर परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाचे नुकसान होते. यामुळे लोकांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अल्सर, अपचन, डायरिया आणि पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


 


 






 



थायरॉईड आणि PCOS - खूप नकारात्मक विचारांमुळे नैराश्य येते. यामुळे शरीरातील अनेक हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला थायरॉईड, मधुमेह आणि आजारांचा धोका वाढू शकतो.


कमकुवत प्रतिकारशक्ती - सतत नकारात्मक विचार केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, संसर्ग किंवा गंभीर रोगांचा धोका असू शकतो. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा.


शरीर दुखणे - याशिवाय नकारात्मक विचार केल्याने इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तणाव वाढू शकतो, ज्यामुळे स्नायूंमध्ये वेदना आणि कडकपणा येतो. अशा स्थितीत तुम्हाला पाठ आणि मानदुखीची समस्या देखील भेडसावू शकते.


 


हेही वाचा>>>


काय सांगता..! आता धूम्रपान न करणाऱ्यांनाही Lung Cancer चा धोका? कसा होतो हा कर्करोग? एका अभ्यासातून खुलासा


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )