Varai Khichadi Recipe : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. दोन वर्षानंतर देशभरात ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होणार आहे.  'नवरात्रोत्सव' म्हटलं की डोळ्यासमोर येतं दांडिया, गरबा आणि उपवासाचे पदार्थ. अनेक मंडळी नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या वरीच्या खिचडीची (Varai Khichadi Recipe) रेसिपी...


'वरीची खिचडी' बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 



  • वरी - वाटीभर

  • हिरव्या मिरच्या - तीन ते चार

  • तूप - दोन चमचे

  • जिरे - चिमूटभर

  • शेंगदाण्याचा कुट - अर्धी वाटी

  • गरम पाणी - आवश्यकेनुसार

  • मीठ - चवीनुसार


'वरीची खिचडी' बनवण्याची कृती -


- 'वरीची खिचडी' बनवण्यासाठी सर्वात आधी वरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. 


- वरीतलं पाणी चांगलं निथळून घ्या. 


- दरम्यान दुसरीकडे गॅसवर कढई तापायला ठेऊन त्यात तूप घालावे. 


- तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकावे. 


- जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावेत. 


- मिरच्या परतल्यानंतर त्यात ओलसर वरी टाकावी. 


- वरी तुपामध्ये छान परतून घ्यावी. 


- वरी वारंवार हलवावी. 


- वरी परतल्यानंतर त्यात पाणी टाकावे. 


- पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कुट आणि चवीनुसार मीठ टाकावे. 


- कढईतलं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.


- त्यानंतर वरीच्या खिचडीवर झाकण ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी. 


- वाफ आली म्हणजे खिचडी तयार झाली आहे. 


- गरमागरम 'वरीची खिचडी' खायला चविष्ट लागते. 


संबंधित बातम्या


Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...


Navratri Recipe : घरच्या घरी बनवा 'उपवासाची पुरी-भाजी'; जाणून घ्या रेसिपी...