Kirthi Suresh weightloss: तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश (Kirti Sureah) हिचा फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन सध्या चर्चेत आहे. 33व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तीने तिच्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितलेले खुलासे चाहत्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. तिने उघड केले की 2018-19 मध्ये तिने फक्त कार्डिओ एक्सरसाइज करून तब्बल 8 ते 9 किलो वजन घटवले, पण त्यामुळे तिचे स्नायू कमी झाले आणि ती अतिशय बारीक दिसू लागली.
“मी खूप वजन कमी केलं, पण स्नायूही गेले”
कीर्तीने सांगितले, “18 वर्षांपर्यंत मी कधीच व्यायाम केला नव्हता. अभिनय सुरू झाल्यावर जीवन फक्त काम, झोप, आणि जेवण एवढ्यावर मर्यादित झालं होतं. मग मी वजन कमी करण्यासाठी कार्डिओ सुरू केलं. त्यात वजन तर कमी झालं, पण शरीरातील स्नायूही कमी झाले.”
योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगने झाली फिट
कोविडच्या काळात कीर्तीने योगा सुरू केला, आणि मग तिच्या आयुष्यातील फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. गेल्या दोन वर्षांपासून ती वेट ट्रेनिंग करते आणि त्यातून तिला हवे तसे परिणाम दिसले आहेत.
डाएटमध्ये प्रोटीन, नाही क्रॅश डाएट!
कीर्ती म्हणाली, “मी कधीही क्रॅश डाएट केलं नाही. माझं आहार तत्त्व एकच – हाय प्रोटीन, लो कार्ब्स. मी रोज सहा ते सात अंड्याचा पांढरा भाग खाते, पनीर, टोफू, सोया आणि डाळी खाते. मला प्रोटीन शेकचीही गरज वाटत नाही.”
काही खायचं असेल तर खाते!
तिचं म्हणणं आहे, “मी काहीच स्वतःवर बंधन ठेवत नाही. मला काही खायचं वाटलं, तर मी खाते. खाण्यापासून घाबरायचं नाही.” कीर्ती सुरेशचं हे फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन फक्त वजन घटवण्याचं उदाहरण नाही, तर समतोल आहार आणि सातत्यपूर्ण व्यायामाने शरीर आणि मन दोन्ही कसं बदलू शकतं, याचं उत्तम उदाहरण आहे.
कीर्ती सुरेश फिटनेस सीक्रेट्स:
-फक्त कार्डिओ नव्हे, स्ट्रेंथ ट्रेनिंगही आवश्यक
-हाय प्रोटीन, लो कार्ब्स डाएट
-रोज योगा आणि वेट ट्रेनिंग
-कुठलेही एक्स्ट्रीम डाएट नाही
-स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकणं महत्वाचं
शूटिंग, प्रवास आणि तणावपूर्ण वेळापत्रक असूनही कीर्ती सुरेशनं स्वतःसाठी वेळ काढला आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं. (Simple Indian diet for weight loss) वजन कमी करण्यासाठी तिनं ना कठोर डाएट फॉलो केलं, ना महागडे प्रोटीन सप्लिमेंट्स घेतले. फक्त नियमित व्यायाम आणि संतुलित भारतीय आहाराच्या मदतीने तिनं तब्बल 9 किलो वजन घटवलं.