Lawyers Black Coat : तुम्ही वकिलांना (Lawyers) काळा कोट घातलेले पाहिले असेल. वकील काळा कोट आणि काळ्या पॅन्टसह पांढरा शर्ट घालतात. वकिलांना पाहून तुमच्या मनात हेच आले असेल की, ते काळा कोट का घालतात? वकील असो की न्यायाधीश, तो नेहमी काळा कोट घालूनच कोर्टात (Court) पोहोचतात. याशिवाय ते इतर कोणतेही कपडे किंवा रंगीत कपडे घालत नाहीत. ही परंपरा हे आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामागे फॅशन नसून त्यामागे खूप जुना इतिहास आहे. त्यामुळे आजही वकील काळे कोट परिधान करताना दिसतात. या मागचे कारण काय आहे ते जाणून घ्या
वकील काळा कोट का घालतात?
वकील काळे कोट का घालतात? याची अनेक कारणे आहेत. इतिहासाबद्दल सांगायचे तर असे म्हटले तर, 1694 मध्ये राणी मेरीचा मृत्यू कांजण्यांमुळे झाला होता. यानंतर किंग विल्यमसन यांनी राणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी कोर्टातील सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी काळे वस्त्र घालावे, असा आदेश दिला होता. याबाबत असेही म्हटले जाते की, वकिलांसाठी काळ्या पोशाखाचा प्रस्ताव 1637 मध्ये मांडण्यात आला होता. वकील बाकी लोकांपेक्षा वेगळे दिसून येतील हा यामागचा उद्देश होता. आणखी एका इतिहासाबाबत बोललो तर असे सांगितले जाते की, इंग्लंडचा राजा चार्ल्स (दुसरा) याच्या मृत्यूच्या दिवशी न्यायाधीश आणि वकील यांना काळा कोट घालण्याचा आदेश देण्यात आला होता. याचे आणखी एक कारण म्हणजे हा रंग सहजासहजी घाण होत नाही. यामुळे ते दररोज परिधान केला जाऊ शकतो. सुरुवातीच्या काळात सोनेरी लाल कापड आणि तपकिरी रंगाचे कपडे न्यायालयात परिधान केले जायचे.
हा ट्रेंड कधी सुरू झाला?
इतिहासानुसार 1327 मध्ये एडवर्डने (III) वकिली सुरू केली होती. त्यावेळीही न्यायाधीशांसाठी वेगळ्या प्रकारचा पोशाख तयार करण्यात आला होता, मात्र त्यावेळी वकिलांचा पोशाख काळा नव्हता. त्यावेळी वकील लाल रंगाचे कपडे आणि तपकिरी गाऊन घालायचे. न्यायाधीश पांढरे केस असलेले विग घालायचे. वकिलांच्या पोशाखात बदल 1600 नंतर आला. 1637 मध्ये एक प्रस्ताव तयार करण्यात आला. ज्यामध्ये न्यायाधीश आणि वकिलांना लोकांसमोर उभे राहण्यासाठी काळे पोशाख घालावे लागले. तेव्हापासून वकील पूर्ण लांबीचे गाऊन परिधान करत आहेत. असे मानले जाते की, हा पोशाख सामान्य लोकांपासून वेगळा बनविला गेला होता.
भारतातील काळ्या कोटची परंपरा
काळा कोट देखील शिस्त आणि आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील वकील काळा कोट घालतात.
ब्रिटिश राजवटीत न्यायाधीश आणि वकील काळा गाऊन आणि सूट घालत असत, परंतु स्वातंत्र्यानंतर 1965 मध्ये भारतात ते अनिवार्य करण्यात आले. शिस्तीसाठी ड्रेस कोडचा वापर करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :