International Yoga Day 2025 : योग आज संपूर्ण जगात आरोग्यासाठी एक 'सुवर्ण मानक' म्हणून ओळखला जात असून भारतीय योग शस्त्रांच महत्व आता साऱ्यांना पटूही लागलं आहे. अशातच संपूर्ण जगात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योग केवळ शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नाही. तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल साधण्याचे माध्यम आहे. याच योग दिनाचे (International Yoga Day) औचित्य साधत पतंजली योगपीठाने 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिन हरियाणातील कुरुक्षेत्र या ऐतिहासिक भूमीत साजरा केला.
यावेळी पतंजली योग हा जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम ही राबवण्यात आली. योगगुरू बाबा रामदेव (Ramdev baba) यांच्या मार्गदर्शनाखाली, हरियाणा योग आयोग आणि आयुष विभागाच्या सहकार्याने, ही मोहीम 21 जून रोजी ब्रह्म सरोवर येथे संपन्न झाली. या मुख्य कार्यक्रम अतिशय भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती लक्षणीय होती.
ब्रह्मसरोवर उमडली मोठी गर्दी
पतंजली योग समितीचे राष्ट्रीय समन्वयक भाई राकेश कुमार भारतम्हणाले, "या वर्षीच्या कार्यक्रमात देशभरातील योगप्रेमींचा मोठा सहभाग अपेक्षित होताच. करण त्यासाठी नागरिकांनी कडक उन्हातही, स्वयंसेवक गावोगावी आणि घरोघरी जाऊन लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक केलं होतं. यात अगदी पिपली, शहााबाद, पेहोवा, थानेसर आणि लाडवा यासारख्या भागात योग प्रशिक्षण सत्रे, सामुदायिक कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मोहिमा आयोजित केल्या होत्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला.
योगासह औषधमुक्त आणि रोगमुक्त जीवनावरही भर
पुढे ते म्हणाले, यावेळी जिल्ह्यातील शाळा, सामुदायिक केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. इस्माईलाबादजवळील रोडी शाहिदान आणि अंग्रावली धर्मशाळा यासारख्या गावांमध्ये विशेष सकाळच्या शिबिरांनी लोकांचे लक्ष वेधलं. या सत्रांमध्ये, योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे, जसे की औषधमुक्त आणि रोगमुक्त जीवन यावर भर दिला गेला.
महिलांचाही लक्षणीय सहभाग, विशेष मोहिमांचे आयोजन
दरम्यान, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, शहााबाद, जिंद आणि सुशांत सिटी सारख्या भागात साध्वी आणि महिला प्रशिक्षकांनी विशेष सत्रांचे आयोजन केले होते. सोशल मिडिया किंवा दुकाना दुकानात जाऊन केलेल्या मोहिमा आणि शाळांमध्ये होणाऱ्या जागरूकता कार्यक्रमांमुळे हा उपक्रम अधिक व्यापक झाला. ज्येष्ठ नागरिक, युवा गट आणि स्थानिक आध्यात्मिक नेते देखील ब्रह्म सरोवर कार्यक्रमात सामील होण्यासाठी समुदायांना प्रेरित करत होते. ही मोहीम केवळ योगाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर निरोगी आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी कुरुक्षेत्राची एकता देखील दर्शवते.
हे ही वाचा
