मुंबई : सण-उत्सव असो वा घरातील लग्नसराई, मिठाईचे सौंदर्य आणि आकर्षकता वाढवण्यासाठी त्यावर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख (Silver Foil Chandi Vark) आपण नेहमीच पाहतो. दिसायला सुंदर असणारा हा चांदीचा वर्ख आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो. मात्र, सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने, मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्खही यापासून सुटलेला नाही.

Continues below advertisement

अनेकदा व्यापारी अधिक नफा मिळवण्यासाठी ॲल्युमिनियम किंवा निकृष्ट दर्जाच्या बनावट चांदीच्या वर्खचा वापर करतात, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. मिठाई खरेदी करताना त्यावर लावलेला चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त, हे ओळखण्याच्या सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

Chandi Vark Glow Texture : चांदीच्या वर्खची चमक आणि जाडी तपासा

शुद्ध चांदीचा वर्ख अत्यंत हलका, मऊ आणि नैसर्गिक चमक देणारा असतो. तो मिठाईच्या पृष्ठभागावर अगदी पारदर्शक आणि बारीक थरासारखा व्यवस्थित चिकटलेला असतो. याउलट, बनावट किंवा भेसळयुक्त वर्ख गरजेशीर जास्त चकाकणारा, जाड आणि ॲल्युमिनियमच्या पत्र्यासारखा दिसतो. जर वर्ख असामान्यपणे जाड किंवा अधिक चमकणारा दिसत असेल तर अशी मिठाई खरेदी करणे टाळावे.

Continues below advertisement

Chandi Vark Touch Test : स्पर्शाने अशी करा वर्खची ओळख

अस्सल चांदीचा वर्ख अत्यंत नाजूक आणि अतिशय पातळ असतो. त्याला बोटांनी स्पर्श केल्यास तो सहजासहजी हाताला चिकटतो किंवा लगेच बारीक तुकडे होऊन विरघळतो. याउलट, भेसळयुक्त किंवा बनावट ॲल्युमिनियमचा वर्ख हा कडक असतो आणि स्पर्श केल्यावर त्याचे सहज तुकडे होत नाहीत.

FSSAI Packaging Chandi Vark : एफएसएसएआय परवाना आणि पॅकिंग तपासा

जर तुम्ही पॅक केलेली मिठाई खरेदी करत असाल, तर पाकिटावर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा (FSSAI) परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव, पॅकिंग तारीख आणि एक्सपायरी डेट (Best Before Date) नक्की तपासा. खाद्य सुरक्षा नियमांनुसार फूड-ग्रेड (Food-Grade) चांदीचा वर्क वापरणे बंधनकारक आहे. नेहमी विश्वासू आणि नामांकित दुकानातूनच खरेदी करावी.

Sweets Price Quality Check : अतिशय स्वस्त मिठाई खरेदी करणे टाळा

जर चांदीचा वर्ख लावलेली मिठाई बाजारातील नेहमीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त दरात मिळत असेल, तर तिच्या दर्जाबद्दल शंका घेण्यास वाव आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अनेकदा घातक रसायने किंवा ॲल्युमिनियमचा वापर करून बनावट वर्ख तयार केला जातो. त्यामुळे केवळ स्वस्त आहे म्हणून मिठाई खरेदी न करता गुणवत्तेला प्राधान्य द्यावे.

मिठाई खरेदी करताना चांदीच्या वर्खसंबंधी काही शंका असल्यास दुकानदाराकडे वापरण्यात आलेला वर्क 'फूड-ग्रेड' आहे की नाही, याची खात्रीशीर चौकशी नक्की करा.

ही बातमी वाचा: