Aloe Vera for Hair : सुंदर आणि निरोगी केस प्रत्येकालाच हवे असतात. अशा केसांसाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. कोणी पार्लरमध्ये जावून ट्रीटमेंट घेतात तर काही लोक घरच्या घरीच काहीतरी उपाय करतात. या सगळ्या उपायांपैकी एक सहज आणि सोपा मार्ग म्हणजे अॅलोवेरा जेलचा वापर केसांसाठी करणे. मात्र अॅलोवेरा जेल लावण्याची योग्य पध्दत कोणती हे जाणून घेऊया.


अॅलोवेरा (ALEOVERA) हे एक औषधी वनस्पती आहे, ज्यात अनेक उपयुक्त गुण आहेत. आयुर्वेदातदेखील याचे अनन्यसाधारण महत्व सांगितले गेले आहे. याचा वापर शरीरासाठी तसेच केसांसाठी केला जाऊ शकतो. त्वचेच्या तसेच केसांच्या सगळ्या समस्येवर एकच रामबाण उपाय म्हणजे अॅलोवेरा जेल. केसांना लांबसडक आणि सिल्की (SILKY)  बनवायचे असेल तर तुम्ही  अॅलोवेरा जेलचा वापर करू शकता. सोबतच अॅलोवेरा जेल केसासाठी कंडिशनर (CONDITIONAR) म्हणूनही काम करते. पण हे अॅलोवेरा जेल ओल्या की कोरड्या केसांवर लावायला हवे? ते किती प्रमाणात लावायला हवे? आणि कसे लावायला हवे याबाबत अनेक जण कंफ्यूज असतात. तर आता जाणून घेवूया अॅलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत,


केसांना अॅलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत कोणती?


अंघोळ करण्याआधी कोरड्या केसांवर अॅलोवेरा जेल लावावे. ओल्या केसांमध्ये अॅलोवेरा जेल लावल्यास केसातील माॅइस्चररायझर (MOISTURIZER) निघून जाते. परिणामी केसांना कोरडेपणा (DRYNESS) येतो.


एक चमचा अॅलोवेरा जेल एका वाटीमध्ये घ्यावे. कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांशी ते लावावे आणि 5 मिनीट मसाज करावा. अर्ध्या तासानंतर तुमच्या आवडत्या शॅम्पूने केस धुवावेत.


आठवड्यातून दोन वेळा  अॅलोवेरा जेल केसांना लावावे. एॅलोवेरा जेल वापरल्याने नैसर्गिकरित्या तुमचे केस सिल्की होवू शकतात. एॅलोवेरा जेल लावल्यानंतर केस माइल्ड शॅम्पूनेच (MILD SHAMPOO) धुवावेत. ज्यामुळे केसांची वाढ (HAIR GROWTH) लवकर होते. 


अॅलोवेरामध्ये व्हिटामिन ईच्या (VITAMIN E)  गोळ्या किंवा नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात  मिक्स करून लावले तरीही तुमच्या केसांची वाढ होऊ शकते. तसेच यामुळे तुमच्या केसांना हवे असणारे पोषण मिळण्यास मदत होते. 


अॅलोवेरा जेलमध्ये ग्रीन टी (GREEN TEA) मिक्स करून केसांना लावल्यास तुमचे केस चमकदार आणि दाट बनू शकतात. 


महत्वाच्या इतर बातम्या