Weight Loss After Pregnancy :  प्रसुतीनंतर अनेकांचे वजन वाढते.  काही जणांना प्रसुतीनंतर बेली फॅट्सची समस्या जाणवते. वाढलेल्या वजनामुळे थकवा जाणवतो. जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता. 


ओव्याचं पाणी 
प्रसुतीनंतर तुम्ही ओव्याचं प्यायल्यानं बेली फॅट कमी होतो. ओव्याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा ओवा किंवा ओव्याची पावडर टाका. हे पाणी दिवसभर प्यायल्यानं काही दिवसातच तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतील.  


बदाम आणि मनुके 
नॉर्मल डिलेवरीनंतर बदाम आणि मनुके खावेत.  दहा मनुके आणि दहा बदाम मिक्स करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर गरम दूधामध्ये मिक्स करून घ्या.  हे दूध रात्री झोपण्याआधी प्या. 


ग्रीन टी
प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असते. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. ग्रीन टी प्यायल्यानंतर व्यायाम केल्याने फॅट ऑक्सिडेशन वाढते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.  


जायफळ टाकलेलं दूध 
जायफळ मिक्स केलेलं दूध रोज रात्री प्यावे. हे  दूध प्यायल्यानं शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha