Home Remedies For Diabetes: दररोजची धावपळ आणि खाण्या-पिण्याकडे झालेलं दुर्लक्ष यांमुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. यापैकी एक समस्या म्हणजे, मधुमेह (Diabetes). सध्या अनेक भारतीय हाय ब्लडप्रेशरसोबतच (High Blood Pressure) डायबिटीजनंही (How To Controll Diabetes) त्रस्त आहेत. आधी केवळ वयोवृद्धांमध्ये आढळणारा हा आजार आता लहानमुलांमध्येही अगदी सर्रास आढळून येतो. डायबिटीजनं वयोवृद्धांपासून लहान मुलांनाही आपल्या विळख्यात अडकवलं आहे. डायबिटीजचा आजार मुळापासून दूर करता येत नाही. 


तुमची दररोजची जीवनशैली आणि योग्य खाण्याच्या सवयींद्वारे यावर नियंत्रण ठेवता येतं. या आजारात रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढू लागते, जी शरीरासाठी घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक ठरतं. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. डायबिटीजवर सर्वोत्तम उपाय ठरणारा पदार्थ म्हणजे, तुमच्या घरात मसाल्याच्या पदार्थांमध्ये आढळून येणारं तमालपत्र (Bay Leaf). याचा वापर करुन तुम्ही डायबिटीजवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवू शकता. जाणून घेऊयात डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी तमालपत्राचे फायदे... 


रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तमालपत्र कसं ठरतं फायदेशीर? (How Is Bay Leaf Beneficial In Controlling Blood Sugar?)


तमालपत्राचा वापर भारतीय स्वयंपाकघरात मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. तमालपत्र जेवणाची चव तर वाढवतंच पण याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तमालपत्राच्या सेवनानं मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास बरीच मदत होते. तमालपत्रात पॉलिफेनॉल आढळतं, जे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. याशिवाय शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यासही मदत होते. याच्या नियमित सेवनानं शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि ग्लुकोज चयापचय सुधारतं.




डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कसं कराल तमालपत्राचं सेवन? (How To Consume Bay Leaf To Keep Diabetes Under Control?)


डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तेजपत्त्याच्या पाण्याचं सेवन करू शकता. हे पाणी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. आता यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता टाका आणि तब्बल 5 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या. नियमितपणे हे पाणी प्यायल्यानं मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अनोशापोटी याचं सेवन करा. यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत मिळते. 


तमालपत्राचं सेवन मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. दरम्यान, लक्षात ठेवा की जर तुमची स्थिती खूप गंभीर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PCOS Belly: PCOS मुळे पोट वाढलंय? पोटाचा घेर कमी करण्यासाठी पाण्यात 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् प्या!