World Pneumonia Day 2023 : जगभरात 12 नोव्हेंबर म्हणजेच आजचा दिवस हा जागतिक न्युमोनिया दिन (World Pneumonia Day) म्हणून साजरा केला जातोय. लोकांना न्युमोनिया आजाराचे गांभीर्य कळावे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. न्युमोनिया आजारात फुफ्फुसांना संसर्ग होतो. न्युमोनिया झाल्यास, श्वसनमार्गामध्ये द्रव किंवा पू भरला जातो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याव्यतिरिक्त, इतर अनेक समस्या दिसतात. न्युमोनियाच्या दिनाच्या दिवशी, आपण सर्वात आधी या आजाराबद्दल जाणून घेऊयात आणि जेव्हा हा आजार होतो तेव्हा शरीरात कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


न्युमोनिया म्हणजे काय? (What is Pneumonia)


न्युमोनिया (Pneumonia) हा एक गंभीर आजार आहे जो फुफ्फुसांना संक्रमित करतो. ज्यामध्ये फुफ्फुसात पाणी भरून सूज येते. हा आजार तुमच्या एक किंवा दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो. न्युमोनिया हा जीवाणू आणि विषाणूंमुळे होतो. जेव्हा न्युमोनिया होतो तेव्हा फुफ्फुसातील श्वसनमार्गामध्ये पू किंवा हवेने भरतात. या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.


न्युमोनियाची लक्षणे (Pneumonia Symptoms)


न्युमोनियाची लक्षणे अशी असतात की अनेक वेळा आपण त्यांना किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक आहे, तर चला जाणून घेऊयात कोणत्या समस्या दीर्घकाळ टिकू शकतात आणि ते न्युमोनियाचे लक्षण असू शकतात. 


1. श्वास घेण्यात अडचण : श्वास घेण्यास त्रास होणे हे न्युमोनियाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे.


2. खोकला होणे : कोरडा खोकला आणि खोकल्यातील श्लेष्मा हे न्युमोनियाचे लक्षण असू शकते. कधीकधी श्लेष्माचा रंग पिवळा, हिरवा असू शकतो आणि श्लेष्मामध्ये रक्त देखील असू शकते.


3. थकवा आणि अशक्तपणा जाणवणे : जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर ते न्युमोनियाचे लक्षण असू शकते.


4. ताप, घाम येणे आणि थंडी वाजणे : ताप आणि थंडी वाजून घाम येणे हे देखील न्युमोनियाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.


5. छातीत दुखणे : खोकताना किंवा दीर्घ श्वास घेताना छातीत दुखत असेल तर ते न्युमोनियाचे लक्षण असू शकते.


6. मळमळ, उलट्या किंवा जुलाबाची समस्या : सतत जुलाब, उलट्या किंवा मळमळ हे देखील न्युमोनियाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


World Diabetes Day 2023 : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आजपासूनच तुमच्या सकाळच्या दिनचर्येत 'या' सवयींचा समावेश करा