Women periods Menstrual Health: भारतात अनेक धार्मिक मान्यता प्रचलित आहेत . त्यातीलच एक म्हणजे मासिक पाळी (Menstruation) . शतकानुशतकापासून भारतातील स्त्रियांचा लढा 'विटाळ ' या शब्दाभोवती सुरु आहे . मासिक पाळीच्या त्या चार दिवसात स्त्रियांना बाजूला बसवणे .त्यांच्यासोबतचा कुठलाही स्पर्श टाळणे .धार्मिक कार्यात सहभागी न करून घेणे अशा कितीतरी गोष्टी आजही अनेक घरांमध्ये पाळल्या जातात . यामागे लोक आपल्या संस्कृती व परंपरेनुसार वेगवेगळी स्पष्टीकरण देतात यात नाविन्य नाही . खरंतर पूर्वी अंगमेहनतीची कामं अधिक असल्यानं घरकाम, चूल - मूल संसार सांभाळताना क्षणभराचीही उसंत न मिळालेल्या बाईला विश्रांतीसाठीचे हे हक्काचे दिवस . त्यामुळे काही परंपरा पाळल्या जायच्या . पण आजच्या काळात वैज्ञानिकदृष्ट्या जाणून घेऊ, मासिक पाळीत महिलांनी मंदिरात जाऊ न देणे योग्य आहे का ?
तज्ञ काय सांगतात ?
डॉक्टरांच्या मते पाळीच्या काळात मंदिरात जाण्यात किंवा पूजा करण्यात काहीही अडचण नाही .ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे . मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीला येते आणि यात मंदिरात जाऊ नये किंवा पूजा करू नये इतके अशुद्ध किंवा घाण असे काहीही नाही .
श्रीकृष्ण मिशन हॉस्पिटलचे डॉक्टर अवधेश उपाध्याय सांगतात की, 'अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या शरीरामधून जो रक्तस्त्राव होतो तो घाणेरडा आहे का ? त्यामुळे पूजा करणे योग्य आहे ? पण हे लक्षात घ्या की पाळीचं रक्त हे घाण नसतं .ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे .दर महिन्याला शरीर गर्भधारणेसाठी स्वतःला तयार करतं .पण गर्भधारणा न झाल्यास शरीर ही तयारी सोडून देतो आणि ते रक्तासह बाहेर टाकलं जातं .त्यामुळे पाळीचं रक्त घाण आहे असं म्हणता येत नाही .'
पाळीमध्ये पूजा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
वैद्यकीय दृष्टिकोनातून हे स्पष्ट झाला आहे की पाळी मध्ये पूजा करण्यास कोणतीही हरकत नाही मात्र या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही तेवढेच गरजेचे आहे .- यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेकडे लक्ष द्या-पूजा करण्यापूर्वी शरीर आणि हात नीट धुवा-पूजेचे ठिकाण स्वच्छ ठेवा-मी पूजा करू शकते की नाही अशा शंका मनात न ठेवता मनापासून पूजा करा .
धार्मिक दृष्टिकोनातून मनाई का केली जाते ?
धार्मिक परंपरेनुसार,स्त्रियांच्या शरीरातून रक्तस्त्राव जात असल्याने मासिक पाळीचा काळ हा स्त्रियांसाठी अशुद्ध मानला जातो .अनेक विद्वानांच्या मते या दिवसात स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये . .तर काहीजणांच्या मते शास्त्रानुसार या काळात स्त्रियांनी पूजा पाठ किंवा धार्मिक विधींमध्ये भाग घेऊ नये असे सांगितले जाते .
