Brain Cancer : माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात. परंतु, यातील कर्करोग हा सर्वात घातक आजार मानला जातो. काही जणांचा कर्करोग बरा होतो. परंतु, हे प्रमाण खूपच कमी आहे. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कर्करोग म्हणजेच कॅन्सरच्या उपचारासाठी तो योग्य वेळी ओळखणे आवश्यक आहे. मेंदूचा कर्करोग हा देखील गंभीर कर्करोगांपैकी एक मानला जातो. वेळीच कॅन्सरचं निदान न झाल्यामुळे बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो, असे अभ्यासातून दिसून आलं आहे. 


Brain Cancer :  150 प्रकारचे ब्रेन कॅन्सर


ब्रेन ट्यूमर हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. मेंदूतील पेशींची संख्या वाढल्याने ब्रेन ट्यूमर होऊ शतको. अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजिकल सर्जनच्या मते, ब्रेन ट्यूमरचे 150 पेक्षा जास्त प्रकार आहेत. हे प्रामुख्याने दोन गटात विभागलेले आहेत. पहिला प्राथमिक आणि दुसरा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर.


Brain Cancer :  काही कर्करोग प्राणघातक असू शकतात


काही ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसलेले असतात तर काही प्राणघातक ठरू शकतात. मेंदूमध्ये सुरू होणाऱ्या आणि वाढणाऱ्या ट्यूमरला प्राथमिक ब्रेन ट्यूमर म्हणतात. हे शरीराच्या इतर भागांतून मेंदूमध्ये पसरणाऱ्या ट्यूमरपेक्षा वेगळे असतात.  


Brain Cancer : काय असताता लक्षणे? 


यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (एनएचएस) च्या म्हणण्यानुसार,  कर्करोगाच्या ट्यूमर आणि कर्करोग नसलेल्या ब्रेन ट्यूमरची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. कारण यातील काही लक्षणे सामान्य असतात. यामध्ये डोकेदुखी, फेफरे येणे, सतत आजारी वाटणे, उलट्या होणे, लक्षात ठेवण्यास त्रास होणे, वागण्यात बदल, बघण्यात आणि बोलण्यात समस्या अशी लक्षणे दिसू शकतात.  


Brain Cancer :  ग्लिओब्लास्टोमा हा प्राणघातक कर्करोग 


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रेन ट्यूमरचे 150 हून अधिक प्रकार आहेत. यापैकी ग्लिओब्लास्टोमास हा प्रौढांमधील सर्वात आक्रमक प्राथमिक कर्करोग मानला जातो. हा कर्करोग मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील पेशींच्या वाढीसह होतो. पण त्याची वाढ खूप वेगाने होते. हळूहळू तो निरोगी पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतो. ग्लिओब्लास्टोमा एस्ट्रोसाइट्स नावाच्या पेशींपासून तयार होतो. हा कर्करोग मज्जासंस्थेशी संबंधित आहे. विशेष म्हणजे हा कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो. 


Brain Cancer :  लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करा 


मेंदूच्या कर्करोगाची शंका असल्यास किंवा मज्जासंस्थेसंबंधीचा विकार दिसल्यास तातडीने न्यूरोलॉजिस्टकडून तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ब्रेन ट्यूमर शोधण्यासाठी न्यूरोलॉजिकल चाचण्या, सीटी स्कॅन, ब्रेन एमआरआय, पीईटी स्कॅन किंवा मेंदूची बायोप्सी केली जाऊ शकते.