Continues below advertisement

Silent Killer Diseases : अनेक गंभीर आजार शरीरात कोणतेही सुरुवातीचे लक्षण (No Early Symptoms) न दाखवता वाढत राहतात. हे आजार हृदय, किडनी, लिव्हर, पॅन्क्रियास यांसारख्या महत्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवतात. शरीराला आतून पोखरत हे शेवटी जीवघेण्या टप्प्यावर घेऊन जातात. WHOच्या अहवालानुसार, जगातील जवळपास 75 टक्के मृत्यू हे अशा नॉन-कम्युनिकेबल रोगांमुळे होतात. यामध्ये हार्ट डिजीज, कॅन्सर, डायबिटीज, रेस्पिरेटरी डिजीज आदींचा समावेश आहे.

1) फॅटी लिव्हर आजार (Fatty Liver Disease)

लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होऊ लागले की ते सुरुवातीला कोणतेच लक्षण दाखवत नाही. वेळेत निदान झाले नाही तर सूज, स्कारिंग आणि शेवटी लिव्हर फेलियर होऊ शकते.

Continues below advertisement

काय काळजी घ्याल?

संतुलित आहार

नियमित व्यायाम

वजन नियंत्रण

लिव्हर फंक्शन टेस्ट वेळेवर करणे

2) हृदयाचा आजार (Heart Disease)

जगातील सर्वाधिक मृत्यू हार्ट डिसीजमुळे होतात. कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज सुरुवातीला कोणत्याही वेदना न देता वाढते आणि अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो.

साइलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीत तीव्र वेदना नसते, त्यावेळी केवळ थकवा, सौम्य वेदना, धाप लागणे अशी लक्षणे दिसतात, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात.

काय काळजी घ्याल?

हार्ट-हेल्दी डाएट

नियमित व्यायाम

तणाव कमी करणे

वेळेवर हार्ट चेकअप

3) हायपरटेंशन (Hypertension)

याला खरा सायलेंट किलर म्हणतात. कारण ब्लड प्रेशर सतत वाढत राहते पण कुठलेही लक्षण दिसत नाही. दीर्घकाळानंतर ते हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी फेलियरचे कारण बनू शकते.

काय काळजी घ्याल?

नियमित BP तपासणी

मीठ कमी करणे

अॅक्टिव राहणे

तंबाखू-दारू टाळणे

तणाव नियंत्रण

4) एचआयव्ही एड्स (HIV AIDS)

HIV संसर्ग सुरुवातीला कोणताही ठळक संकेत दाखवत नाही. हलका ताप, घसा दुखणे अशा सामान्य लक्षणांमुळे लोक तपासणीच करत नाहीत. पण व्हायरस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सतत कमी करत राहतो.

काय काळजी घ्याल?

सुरक्षित संबंध ठेवणे

नियमित HIV टेस्ट

पॉझिटिव्ह असल्यास ART समयावर सुरू करणे

5) टाइप-2 डायबिटीज (Type-2 Diabetes)

सुरुवातीला जवळपास कोणतेही वेगळे लक्षण नसते. पण शरीरात इन्सुलिन कमी कार्य करू लागल्यावर ते हळूहळू हृदय, किडनी, डोळे आणि नसा खराब करू लागते.

काय काळजी घ्याल?

हेल्दी डाएट

नियमित व्यायाम

वजन नियंत्रण

ब्लड शुगरची वेळोवेळी तपासणी

ही बातमी वाचा: