Morning Pranayama Benefits : सकाळची वेळ ही शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. अशा वेळी दिवसाची सुरुवात जर प्राणायामाने (Pranayama) केली, तर ते शरीराला दिवसभर अॅक्टिव्ह ठेवण्यास आणि मन शांत ठेवण्यास मोठी मदत करू शकते. प्राणायाम ही श्वासांवर नियंत्रण मिळवण्याची एक योगिक प्रक्रिया असून, दररोज सकाळी याचा सराव केल्याने सकारात्मक ऊर्जेने दिवसाची सुरुवात होते.
Benefits Of Pranayama : प्राणायाम करण्याचे महत्त्वाचे फायदे
प्राणायाम करताना योग्य पद्धत आणि स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी प्राणायाम करण्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:
तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते : प्राणायामादरम्यान श्वासांवर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होतो. नियमित सरावाने एकाग्रता (Concentration) वाढण्यास मदत होते, जे विद्यार्थी व नोकरदारांसाठी खूप फायदेशीर आहे.
श्वसन क्षमता सुधारते व शरीर अॅक्टिव्ह राहते : प्राणायामामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वसनसंस्था मजबूत होते. सकाळी प्राणायाम केल्याने शरीरातील आळस दूर होऊन ताजेतवाने वाटते.
गाढ आणि उत्तम झोप मिळते : नियमित प्राणायामामुळे शरीर आणि मन शांत राहते, ज्यामुळे रात्री गाढ झोप येण्यास मदत होते.
सकाळची दिनचर्या शिस्तबद्ध होते : सकाळी उठून प्राणायाम करण्याची सवय लागल्यास तुमची रोजची जीवनशैली आणि दिनचर्या अधिक शिस्तबद्ध अन् आरोग्यदायी बनते.
Pranayama Precautions : प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी?
प्राणायाम नेहमी आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करावा.
खूप वेगाने श्वास घेणे किंवा जास्त वेळ श्वास रोखून धरणे (कुंभक) टाळावे.
जर तुम्हाला श्वासाशी संबंधित काही गंभीर आजार किंवा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्राणायाम सुरू करावा.
ही बातमी वाचा:
