एक्स्प्लोर

Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Sudden Leg Pain Deficiency : विना दुखापत अचानक पाय दुखणे, पेटके येणे किंवा मुंग्या येणे हे शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. जाणून घ्या सविस्तर.

Leg Pain Health News : आपल्या दैनंदिन जीवनात पायात वेदना किंवा त्रास होणे ही एक सामान्य समस्या वाटू शकते. अनेकदा जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा एकाच जागी बसून राहिल्याने पायात वेदना होणे, पेटके (Cramps) येणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या जाणवतात. साधारणपणे ही समस्या थोड्या वेळात विश्रांती घेतल्यानंतर आपोआप दूर होते.

मात्र, जर कोणत्याही मेहनतीशिवाय किंवा दुखापतीशिवाय तुमच्या पायात वारंवार अचानक वेदना होत असतील आणि हा त्रास दीर्घकाळ टिकून राहत असेल, तर ते तुमच्या शरीरात काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची (Nutrients) कमतरता असल्याचे गंभीर संकेत असू शकतात.

Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन डी कमतरता

आपल्या शरीरातील स्नायू, हाडे आणि मज्जासंस्था (Nerves) सुखरूप कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन डीची अत्यंत गरज असते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास सतत थकवा, अशक्तपणा आणि शरीरात वेदना जाणवू लागतात. अनेक लोकांना व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे पाठीत, कंबरेत आणि पायात तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे, मात्र गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेता येतात.

Calcium Deficiency : कॅल्शियमची कमतरता

अनेकदा लोकांना वाटते की कॅल्शियम फक्त हाडांच्या बळकटीसाठीच आवश्यक असते. मात्र, कॅल्शियमच्या कमतरतेचा थेट परिणाम हाडांसोबतच शरीराच्या स्नायूंवरही (Muscles) होतो. शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास स्नायूंमध्ये तणाव, खिंचाव आणि अचानक पेटके येण्याचा त्रास सुरू होतो. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर, ताक आणि तिळाचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी 12 मुळे पाय सुन्न पडणे

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे नसा आणि स्नायूंमध्ये सुन्नपणा (Numbness), ताण आणि मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते. अनेक लोकांना रात्री झोपताना पायात गोळा येणे किंवा पेटके येण्याची तक्रार असते, याचे मुख्य कारण व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हेच असू शकते. व्हिटॅमिन बी 12 थेट चेतासंस्थेवर परिणाम करते, ज्यामुळे पायात अचानक वेदना सुरू होतात.

Health Tips Leg Pain : संतुलित आहाराने करा कमतरता पूर्ण

शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवतो:

हिरव्या भाज्या आणि फळे: आहारात पालेभाज्या, हिरव्या भाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करा.

दुग्धजन्य पदार्थ व अंडी: दूध, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात.

सक्रिय जीवनशैली: नियमित हलका व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली (Active Lifestyle) तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

जर पायातील वेदनांची समस्या वारंवार होत असेल आणि आराम पडत नसेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

ही बातमी वाचा:

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget