International Yoga Day 2025: शरीर आणि आत्मा, मनाचं संतुलन, अष्टांग योगाचं सामर्थ्य अन् फायदा
International Yoga Day 2025: पतंजली योगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे नैसर्गिक उपचारावर जोर दिला जातो. औषधं किंवा गुंतागुंतीच्या चिकिस्ता प्रक्रियांवरील अवलंबित्व कमी होतं.

International Yoga Day 2025: आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जिथं तणाव, दैनंदिन जीवनक्रम आणि आरोग्यदायी आहार न घेतल्यानं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पतंजलीचं योगाचं तंत्र प्रभावी उपाय म्हणून समोर आलं आहे. महर्षी पतंजली यांनी त्यांच्या योग सूत्रात योगाचा पाया रचला होता. यामुळं केवळ शारीरिक स्वास्थ चांगलं होत नाही तर मानसिक आणि अध्यात्मिक संतुलन देखील मिळतं. हे तंत्र प्राकृतिक , सोपं आणि सर्व वयोगटाील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. यामुळं निरोगी जीवनशैली पुन्हा मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो.
पतंजली योगाचा आधार अष्टांग योग आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीचा समावेश आहे. हे आठ अंगांचा मिळून एक समग्र दृष्टिकोण मिळतो. ज्यामुळं शरीर आणि मन संतुलित होतं. प्राणायाम यामुळं शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. नियमितपणे सूर्यनमस्कार, भुजंगासन आणि अनुलोम आणि विलोम यासारखे योगप्रकार केल्यानं रक्तप्रवाह सुधारतो. मांसपेशी मजबूत होतात आणि ताण कमी होतो. हे योगाभ्यास सोपे आहेत हे कोणत्याही उपकरणाशिवाय केले जाऊ शकतात.
पतंजली योगचं वैशिष्ट्य काय?
पतंजली योगचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते नैसर्गिक उपचारावर जोर देते. यामुळं गुंतागुंतीच्या उपचार पद्धतींवरील अवलंबित्व कमी होतं. प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक समस्यांपासून सुटका होते. वैज्ञानिक अभ्यासासानुसार नियमितपणे योग केल्यानं कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळं झोपेची गुणवत्ता सुधारते. मानसिक स्वास्थ्य सुधारतं. याशिवाय योगाची मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग या सारख्या जुन्या आजारांच्या उपचारांमध्ये मदत होते.
कोणत्याही उपकरणांशिवाय योग करता येतो
पतंजलीच्या योग तंत्राचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे तो सर्वांसाठी सोपा आहे. विशेष ठिकाणी किंवा महागडी उपकरणं आणि दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. बाबा रामदेव यासारख्या योग गुरुंनी योगाला लोकप्रिय केलं आहे. लाखो लोकांनी योगाला त्यांच्या दिनचर्येत स्थान दिलं आहे. यामुळं शरीर निरोगी ठेवण्यास पुन्हा पुन्हा मदत मिळते. आत्म जागरुकता आणि सकारात्मक जीवनशैलीला देखील प्राधान्य मिळतं. पतंजली योग तंत्र आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एक सोपी, किफायतशीर आणि प्रभावी मार्ग आहे, ज्याचा वापर करणं सर्वांसाठी सोपं आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























