How To Prevent Blindness : डोळे हा एक आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. डोळ्यांच्या मदतीने आपण सर्व काही पाहू शकतो. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. डोळ्यांची नियमीत योग्य ती काळजी घ्या असे डाॅक्टर अनेकदा सांगतात. डोळ्याच्या संदर्भात  कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही तात्काळ डाॅक्टरकडे जाणे गरजेचे आहे. डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला वेळेवर घेतल्यास समस्या वेळेत कमी किंवा दूर केली जाऊ शकते. कारण डोळे इतके संवेदनशील असतात की त्यांच्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येऊ शकते.


डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका


डोळ्यांच्या समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. म्हणूनच अगदी लहान वयापासून डोळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांमध्ये काचबिंदूची समस्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे कालांतराने अंधत्वाचा धोका वाढू शकतो. इतकेच नाही तर वाढत्या वयात होणारा मोतीबिंदूची समस्याही तुम्हाला कायमचे अंधत्व आणू शकतात. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास सावध राहावे.


अंधुक दिसणे


जर तुम्हाला अंधुक दिसत असेल तर ते अनेक प्रकारच्या रोगाचे लक्षणं असू शकते. मोतीबिंदूमुळे किंवा चष्मा लागणार असेल तर अशा वेळी तुम्हाला अंधुक दिसायला लागते. यावर तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, बहुतेक मोतीबिंदू हे वयाबरोबर डोळ्यांमध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे होतो, त्यामुळे वेळीच काळजी न घेतल्यास त्यांना अंधत्व येऊ शकते. काचबिंदूसाठी कोणताही निश्चित उपचार पद्धती नाही. तथापि, वेळेवर उपचाराने समस्या दूर केली जाऊ शकते. डोळ्यांच्या डाॅक्टरांना नियमित भेट दिल्यामुळे मोठ्या आजारांवर उपचार करणे तर शक्य होतेच, शिवाय डोळ्यांचा इतर समस्याही दूर होतात.   


सतत डोळे दुखणे 


डोळ्यांच्या अनेक आजारांमुळे वेदना वाढू शकतात. डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे वेदना होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, डोळे दुखणे म्हणजे डोळ्यांवर खूप ताण येत आहे. हे देखील काचबिंदूचे लक्षण असू शकते. हा त्रास जर खूप दिवस
तसाच राहिला असेल तक डोळ्यांच्या डाॅक्टरकडे जावे आणि उपचार घ्यावेत. मोबाईल आणि संगणकाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर स्क्रीनची लाइट पडत राहते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्यापासून आणि थकवा येण्यापासून ते मायोपिया आणि एएमडीसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


इतर महत्वाच्या बातम्या