(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : पावसाळ्यात सॅलड खाणे योग्य आहे का? वाचा सविस्तर
Health Tips For Rainy Season : अनेक लोकांना सॅलड खायला फार आवडते. मात्र पावसाळ्यात सॅलड खाणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेऊ.
Health Tips For Rainy Season : भारतात पावसाळ्याची (Mansoon) सुरुवात झाली आहे. सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. या पावसाळ्याच्या ऋतूत अनेक आजार देखील बळावतात. या ऋतूत प्रतिकारकशक्ती (Immunity) कमकुवत होऊ लागते, म्हणून बरेच लोक कच्चं सॅलड (Salad) किंवा कोशिंबीर खाण्यास सुरुवात करतात. कोशिंबीर खाल्ल्याने शरीरास बरेच पोषक द्रव्ये मिळतात, परंतु पावसाळ्यात कच्चं सॅलड आजारांना (Disease) निमंत्रण देऊ शकतं, म्हणून पावसाळ्यात कच्चं सॅलड खाताना कोणकोणती खबरदारी घ्यावयाची आहे जाणून घेऊया...
तज्ज्ञ सांगतात की हिरव्या पालेभाज्या आणि कच्च्या भाज्या (Vegetable) खाण्याच्या पूर्वी चांगल्या प्रकारे पाण्यात उकळून घ्या, कारण कीटकांसह अनेक जिवाणू भाज्यांना लागलेले असतात, ज्यामुळे हंगामी रोग होऊ शकतो. शक्यतो पावसाळ्यात पालेभाज्या वापरु नये. जसे की कोबी, पालक हे खाऊ नये, कारण या भाज्यांवर असे सूक्ष्म कीटक आणि जिवाणू व विषाणू असतात ज्यांना आपण बघू शकत नाही आणि हे आपल्या पोटात जाऊन पचनशक्ती (Digestion) बिघडवू शकतात. ज्यामुळे अनेक पोटाचे आजार (Stomach Disease) होण्याची शक्यता असते.
पावसात (Monsoon) सॅलड खाण्याचे तोटे
कोशिंबीर फक्त हिरव्या भाज्यांपासून (Green Vegetables) बनवली जाते. ज्यामध्ये अनेक बॅक्टेरिया (Bacteria) असू शकतात. सॅलडमध्ये आढळणारा बॅक्टेरियाचा संसर्ग देखील पोट आणि आतडे खराब करु शकतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्हाला मळमळ आणि उलट्या (Vomit) देखील होऊ शकतात. काहीवेळा ब्रोकली, कोबी आणि पालकमध्ये लपलेले कीटक देखील सॅलडमध्ये जातात, ज्यामुळे पुढे जाऊन बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.
पावसाळ्यात भाज्या नियमित उकळून घ्या
सॅलडमध्ये हिरव्या भाज्या टाकताना त्या चांगल्या उकळा कारण त्यामुळे पोटात गडबड होऊ शकते. सॅलड बनवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. तसेच, तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याचा धोका नाही.
असे सॅलड खा
जेवणासोबत कोशिंबीरही खावी. उदाहरणार्थ, तुम्ही स्प्राऊट्समध्ये (Sprouts) मिसळून हिरव्या भाज्या खाऊ शकता. तुम्ही फळे किंवा भाज्या मिसळून स्प्राऊट्स खाऊ शकता. याने तुम्ही निरोगीही राहाल आणि तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही समस्या येणार नाहीत. म्हणूनच पावसाळ्यात कच्चे सॅलड खाणे टाळण्याचा प्रयत्न करा.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )