एक्स्प्लोर

Health Tips : व्हॅलेंटाईन डे विशेष - कर्करोगाशी लढताना जोडीदाराची साथ महत्त्वाची; मानसिक बळ देण्यासाठी जोडीदाराने 'या' गोष्टी कराव्यात

Health Tips : कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी सामना करताना जोडीदाराचे प्रेम, साथ आणि समजूतदारपणा हेच रुग्णासाठी सर्वात मोठे गिफ्ट ठरते.

Health Tips : व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेम, आनंद आणि नात्यांचा उत्सव डोळ्यासमोर येतो. मात्र काही जोडप्यांसाठी हा दिवस आयुष्यातील कठीण टप्प्यातही एकमेकांच्या सोबतीची जाणीव करुन देणारा ठरतो. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी सामना करताना जोडीदाराचे प्रेम, साथ आणि समजूतदारपणा हेच रुग्णासाठी सर्वात मोठे गिफ्ट ठरते.

कर्करोगाचे निदान हे रुग्ण आणि कुटुंबीयांसाठी भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठे आव्हान असते. उपचारांच्या प्रवासात औषधे, शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते ती जोडीदाराची खंबीर साथ. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाशी लढताना रुग्णाच्या मनोबलावर जोडीदाराच्या पाठिंब्याचा थेट परिणाम होतो.

कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो आणि अस्पष्ट वजन कमी होणे, सतत वेदना, थकवा, असामान्य गाठी, रक्तस्त्राव किंवा दीर्घकाळ खोकला किंवा पचन समस्या यांसारख्या लक्षणांमुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर, आहाराच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, प्रदूषण, संसर्ग आणि अनुवांशिकता ही यामागची कारणं आहेत. वेळीच निदान न झाल्यास, कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरणे, तीव्र अशक्तपणा, भावनिक त्रास, आर्थिक ताण आणि जीवनाची गुणवत्ता खालावणे यांसारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. जीवनशैलीतील बदल, पर्यावरणीय संपर्क, ताणतणाव, उशीरा निदान आणि अनुवांशिक घटकांमुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. कर्करोगाच्या निदानाने अनेक व्यक्तींचे जीवन बदलते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णामध्ये भीती, नैराश्य, राग किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी जोडीदाराने शांतपणे ऐकून घेणे, भावनांना मान्यता देणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. “मी तुझ्यासोबत आहे” ही भावना रुग्णाला मोठे बळ देते.

उपचार प्रक्रियेत जोडीदाराचा सक्रिय सहभाग

डॉक्टरांना भेटणे, तपासण्या, उपचारांचे वेळापत्रक यामध्ये जोडीदाराने सक्रिय सहभाग घेतल्यास रुग्णाचा ताण कमी होतो. उपचारांबद्दल माहिती समजून घेणे आणि योग्य निर्णय प्रक्रियेत सहभागी होणेही तितकेच गरजेचे आहे.

दैनंदिन कामांमध्ये मदत

उपचारांमुळे थकवा, मळमळ किंवा शारीरिक अशक्तपणा येऊ शकतो. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणे, पोषक आहाराची काळजी घेणे आणि विश्रांतीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे ही जोडीदाराची महत्त्वाची भूमिका ठरते.

मानसिक आणि शारीरिक आधार

कर्करोगामुळे नात्यात बदल जाणवू शकतात. अशा वेळी मनमोकळा संवाद साधणे, समजूतदारपणा दाखवणे आणि परस्परांतील भावनिक जवळीक टिकवून ठेवणे आवश्यक आहे. प्रेम, संयम आणि सहानुभूती हीच नात्याची खरी ताकद ठरते. तुमच्या जोडीदाराला औषधे व उपचार वेळेवर दिली जातील याची खात्री करणे. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे वेळापत्रक पाळणे, पाण्याची योग्य मात्रा देणे आणि साइड इफेक्ट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

स्वतःची काळजी घेणेही तितकेच गरजेचं

तज्ज्ञ सांगतात की, जोडीदाराने स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक संतुलनाचीही काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास समुपदेशन किंवा सपोर्ट ग्रुपची मदत घ्यावी. कारण एक सक्षम जोडीदारच रुग्णासाठी मजबूत आधार बनू शकतो.

कर्करोगाशी लढाई ही केवळ एका व्यक्तीची नसून संपूर्ण कुटुंबाची असते. या प्रवासात जोडीदाराची साथ रुग्णासाठी औषधांइतकीच प्रभावी ठरते. आशा, प्रेम आणि विश्वास यांच्या बळावर ही लढाई अधिक सक्षमपणे लढता येऊ शकते.

- डॉ. अभिषेक पुरकायस्थ, सल्लागार, टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर.

हे ही वाचा : 

यकृताचे संरक्षण आणि आयुर्वेद: 'पुरावा आधारित औषधे' तुमचे जीवन कसे वाचवतात, ते जाणून घ्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget