Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात रोजचा प्रवास आणि ड्रायव्हिंग शक्यतो टाळता येत नाही. मात्र, वाहन चालवताना किंवा नंतर पाठदुखीची समस्या आता खूप सामान्य झाली आहे. Neo Spine Clinic मध्ये अनेक रुग्ण कंबरदुखी, माकड हाडाच्या वेदना (tailbone) आणि मान आखडणे या तक्रारींसह ओपाडीमध्ये दाखल होतात. दीर्घकाळ वाहन चालवणे हे यामागचे मुख्य कारण आहे.
ड्रायव्हिंग करताना आपण एकाच स्थितीत बराच वेळ बसतो, त्यामुळे शारीरीक हालचाल कमी होते आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठीला अनेक धक्के बसतात. याचा थेट परिणाम मणक्यावर होतो. आधीपासूनच स्लिप डिस्क, सायटिका किंवा स्नायू आखढणे यांसारखे आजार असतील तर त्रास आणखी वाढू शकतो.
वाहन चालवताना पाठदुखी कशी होते?
दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे : एकाच स्थितीत बसल्यामुळे मणक्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि स्नायूंमध्ये कडकपणा वाढतो.
बसण्याची चुकीची पद्धत : वाकून बसणे किंवा बसताना पुढच्या बाजूला झुकणे यामुळे कंबर आणि मानेवर ताण येतो.
रस्त्यावरील खड्डे : खराब रस्ते आणि खड्डांमुळे मणक्यांना इजा होऊ शकते.
शारीरिक हालचालींचा अभाव : हालचाल न झाल्याने रक्ताभिसरण कमी होते आणि स्नायू कमकुवत होतात.
जास्त वेळ वाहन चालविल्यानंतर अगदी निरोगी व्यक्तीलाही पाठदुखी होऊ शकते, त्यामुळे आधीच पाठदुखी असलेल्यांचा त्रास आणखी वाढू शकतो.
पाठदुखी टाळण्यासाठी 'असे' करा उपाय
योग्य शारीरिक स्थिती राखा.
मागच्या खिशातील पर्स, मोबाईल काढून बसा.
स्टिअरिंगपासून योग्य अंतर ठेवा; पुढे झुकून बसू नका.
सीट थोडी मागे झुकलेली ठेवा (सुमारे 100–110 अंश).
कंबरेला योग्य आधार द्या; गरज असल्यास लंबर सपोर्ट कुशन वापरा.
आरामदायी गाडी वापरा
लांब प्रवासासाठी आरामदायक सीट असलेली गाडी निवडा.
शॉक अॅब्झॉर्बर आणि टायर्स चांगल्या स्थितीत आहेत का हे तपासा.
अचानक ब्रेक मारणे तसेच खराब रस्तांवर प्रवास करणे टाळा.
सीट कुशन किंवा बॅक सपोर्टचा वापर करा.
दर 1.5 ते 2 तासांनी 5–10 मिनिटांचा ब्रेक घ्या.
ठराविक अंतराने गाडीतून बाहेर उतरा. थोडा वेळ चाला आणि स्ट्रेचिंग करा.
हलके स्ट्रेचिंग स्नायूंचा कडकपणा कमी होतो.
वाहन चालवताना थोड्याफार प्रमाणात शारीरिक हालचाली करा
दर 15–20 मिनिटांनी बसण्याची स्थिती काहीशी बदला.
किरकोळ हालचालींमुळे रक्तप्रवाह सुधारतो.
एकाच स्थितीत बसून राहू नका.
लांब प्रवासात वाहन चालवण्याची जबाबदारी वाटून घ्या
शक्य असल्यास प्रवासात ड्रायव्हिंग शेअर करा.
एकाच व्यक्तीच्या मणक्यावर सतत ताण येणार नाही.
पायांना योग्य आधार द्या
मांड्या सीटवर नीट टेकल्या पाहिजेत.
गुडघे कंबरेइतके किंवा थोडे खाली असावेत.
पाय पेडलवर सहज पोहोचतील याची खात्री करा.
मानसिकरित्या थकवा येणार नाही याची काळजी घ्या
सौम्य संगीत, ऑडिओबुक ऐका.
प्रवाशांनी वाचन करा.
नियमित व्यायाम करा
रोजचे स्ट्रेचिंग आणि कोअर एक्सरसाईजेस मणक्याला मजबूत करतात.
पाठीचा कणा मजबूत असल्यास वाहन चालवताना पाठदुखीचा त्रास कमी होतो.
पूर्वीपासून पाठदुखी असल्यास काय करावे?
जर तुम्हाला आधीपासून पाठदुखी किंवा मणक्याचा आजार असेल तर,
हॅाट ॲण्ड कोल्ड पॅक वापरा.
थोड्या थोड्या अंतरनाने हॅाट ॲण्ड कोल्ड पॅक वापरा.
हिवाळ्यात हीटेड सीट्स उपयोगी ठरतात.
वेदनाशामक औषधे आणि मलम सोबत बाळगा.
डॉक्टरांनी सांगितलेले मलम किंवा औषधे सोबत ठेवा.
ऑर्थोपेडिक सपोर्टचा वापर करा
लंबर बेल्ट किंवा नेक कॉलर वापरा.
टेलबोनच्या वेदना टाळण्यासाठी कॉक्सिक्स कुशन वापरा.
वेदनेकडे दुर्लक्ष करू नका
ड्रायव्हिंग करताना वेदना सुरू झाल्यास :
गाडी बाजूला थांबवा.
स्ट्रेचिंग करा.
हॅाट /कोल्ड पॅक वापरा.
वेदना कमी झाल्यावरच पुन्हा ड्रायव्हिंग सुरू करा.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?
ड्रायव्हिंगनंतर खालील लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या:
काही दिवसांपेक्षा जास्त टिकणारी पाठदुखी
पाय किंवा हातात सततची वेदना
सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास
चालताना किंवा सरळ बसताना अडचण येत असेल
बसताना योग्य शारीरिक स्थिती राखणे, नियमित ब्रेक घेणे, पाठीला योग्य सपोर्ट आणि मणक्याची काळजी घेतल्यास लांब प्रवासही वेदनामुक्त होऊ शकतो. योग्य खबरदारी घेतल्यास तुम्ही नक्कीच सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करू शकता.
- डॉ. अमित शर्मा, स्पाईन सर्जन, जसलोक हॉस्पिटल, मुंबई
हे ही वाचा :
