(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच असेल तर काय होईल? गर्भधारणेत येतात समस्या? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
Health : काही लोकं असे मानतात की पती-पत्नीच्या समान रक्तगटामुळे गर्भधारणा होण्यास समस्या येतात? बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते आणि वारंवार गर्भपात होऊ शकतो. यात किती तथ्य आहे?
Health : आपण नेहमी मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत की, पती-पत्नीचा रक्तगट सारखा नसावा. मात्र यामागे कारणं काय आहेत? याबद्दल जास्त कोणाला माहित नसते, लग्नाच्या वेळी दोघांचा रक्तगट तपासला जातो. दोघांचा रक्तगट एकच असेल तर त्यांनी लग्न करावे की नाही? असा सल्ला डॉक्टरांकडून बऱ्याचदा घेतला जातो. कारण काही लोकं असे मानतात की समान रक्तगटामुळे गर्भधारणा होण्यास समस्या येऊ शकतात, बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते आणि वारंवार गर्भपात होऊ शकतो. यात किती तथ्य आहे? आज आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
तज्ञांचे मत
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मेडिकोव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. अहमद खान यांनी याबाबत माहिती दिलीय. ते म्हणतात, "पती-पत्नीचा रक्तगट सारखाच असेल तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. याचा अर्थ त्यांना रक्तगटाचा वारसा त्यांच्या पालकांकडून मिळाला आहे. त्याचा फायदा असा आहे की रक्तगट समान असल्यामुळे ते एकमेकांना रक्तदान करू शकतात.
पती-पत्नीचे रक्तगट वेगवेगळे असल्यास काय होते?
डॉ खान असेही म्हणतात, "काही प्रकरणांमध्ये, जर महिलेचा रक्तगट आरएच निगेटिव्ह असेल आणि पतीचा आरएच-पॉझिटिव्ह असेल (उदाहरणार्थ A+ आणि A-), तर गर्भधारणेदरम्यान काही समस्या असू शकतात." जर बाळाला वडिलांकडून आरएच-पॉझिटिव्ह घटकांचा वारसा मिळाला, तर आरएच इनकम्पेटिबिलिटी नावाची समस्या उद्भवू शकते. याव्यतिरिक्त, पहिल्या गर्भधारणेमध्ये बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह असल्यास, प्रसूतीच्या वेळी त्याच्या रक्त पेशी आईच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतील. ज्यामुळे आईची रोगप्रतिकारक प्रणाली बाळाच्या रक्ताविरूद्ध काही एंटीबॉडीज तयार करते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान फीटल अब्नोर्मलिटी आणि गर्भपात यासारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
पती-पत्नीचा रक्तगट एकच असेल तर हा उपाय करा.
या गुंतागुंतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, Rh Immune Globulin इंजेक्शन सारख्या वैद्यकीय उपचार केले पाहिजेत. हे ‘RH’ पॉझिटिव्ह रक्तपेशी आणि अँटीबॉडीजना निष्क्रीय करते. गर्भपात आणि गर्भधारणेदरम्यान हे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. म्हणून, गर्भधारणेदरम्यान केलेल्या रक्त तपासणीमध्ये अँटीबॉडी लेवल चाचणी केली जाते.
लग्नापूर्वी रक्त तपासणी अवश्य करा..
सर्व जोडप्यांना हे माहित असले पाहिजे की, या अशा प्रकारच्या समस्येवर उपाय केले जाऊ शकतात, तसेच समान रक्तगट असलेले जोडपे निरोगी मुलाला जन्म देऊ शकतात. याशिवाय पालक बनू इच्छिणाऱ्या जोडप्यांना एकमेकांच्या रक्तगटाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तुमचा जोडीदार एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे की इतर लैंगिक आजारांनी बाधित आहे हे शोधण्यासाठी देखील लग्नापूर्वी रक्त तपासणी केली पाहिजे. हे जाणून घेतल्याने जोडपे या गंभीर आजारांच्या संपर्कात येण्यापासून वाचतात.
हेही वाचा>>>
Health : वयाच्या पन्नाशीतही इतकी फिट? यामागे काय गुपित? मलायका अरोरा करते 'हे' 5 व्यायाम, जाणून घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )