Health: आजकाल आपण पाहतो, जगात अनेक लोक जोडीदारासोबत राहण्यापेक्षा एकटं राहण्याला अधिक प्राधान्य देतात. एकटं राहणं कधीकधी तुम्हाला आनंद देऊ शकते, परंतु तुम्हाला हे माहितीय का? एकटे राहणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. हो... हे खरं आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जीवनात जोडीदाराशिवाय एकटं राहणं यामुळे तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय. जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.. (Lifestyle News)
एकटे राहणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक? अभ्यासात म्हटलंय..
एका नवीन अभ्यासानुसार, एकटेपणा केवळ मानसिक आरोग्याला हानी पोहोचवत नाही तर संसर्ग देखील होऊ शकतो. अभ्यास काय म्हणतो ते जाणून घेऊया. यूकेमधील केंब्रिज विद्यापीठ आणि चीनमधील फुदान विद्यापीठातील संशोधकांनी यूके बायोबँक अभ्यासात 42000 हून अधिक प्रौढांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली. ज्यामध्ये त्यांना आढळले की सोशली क्वारंटाईन आणि एकटेपणा हा रक्तातील वेगवेगळ्या प्रथिनांशी जोडलेला आहे, जो जळजळ, रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आणि ताणतणाव यासारख्या आरोग्य समस्यांवर गंभीर परिणाम करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहते तेव्हा ती सामाजिक संपर्क आणि इतर एक्टिव्हिटींपासून दूर राहते.
एका अभ्यासातून आश्चर्यकारक माहिती समोर...
नेचर ह्यूमन बिहेवियरच्या एका अभ्यासातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली. एकटे राहणाऱ्या लोकांच्या प्रथिनांमध्ये लक्षणीय ओव्हरलॅप आढळून आले. तर संशोधकांनी सोशली क्वारंटाईन असलेल्या लोकांची 175 प्रथिने आणि एकटे असलेल्या लोकांशी संबंधित 26 प्रथिने ओळखली, यापैकी 85% प्रथिने एकमेकांशी ओव्हरलॅप होतात. ही प्रथिने जळजळ, विषाणूजन्य प्रतिक्रिया आणि मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या आजारांमध्ये गुंतलेली असतात.
एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये असं प्रोटीन सापडलं...
रिसर्चच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, या लोकांमध्ये एक प्रमुख प्रथिन ADM होते, जे ताण आणि ऑक्सिटोसिन सारख्या सोशल हार्मोन्सला नियंत्रण करते, ज्याला "लव हार्मोन" म्हणून ओळखले जाते. शरीरात ADM ची उच्च पातळी भावनिक आणि सामाजिक प्रक्रियेसाठी जबाबदार ठरते, तसेच लहान मेंदू आणि लवकर मृत्यूच्या वाढीव जोखमीशी संबंधित ठरते. आणखी एक प्रथिन, ASGR1, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाच्या मोठ्या जोखमीशी देखील जोडले गेले होते. इतर प्रथिन इन्सुलिन प्रतिरोध, धमन्यांचे नुकसान आणि अगदी कर्करोगाच्या प्रगतीशी जोडले गेले आहेत.
चांगल्या आरोग्यासाठी काय करावे?
तज्ज्ञ सांगतात, चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सामाजिकरित्या जोडलेले राहा. विविध सामाजिक कार्यक्रम आणि सहभागी राहा, कारण अशा गोष्टी एकाकीपणा कमी करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात."
हेही वाचा>>
बाबा रामदेव म्हणाले आनुवंशिक आणि जीवनशैलीतील रोगांवर 'परम औषधी' हा उपाय आहे, त्यांनी हा सल्ला दिला
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
