Health: रोज 1 कप लिंबू-लवंगाचा चहा पिऊन तर बघा.. शरीरातील 'हे' बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल! डॉक्टर सांगतात..
Health: आज आम्ही तुम्हाला लवंग आणि लिंबू असलेल्या हेल्दी चहाबद्दल सांगत आहोत, ज्याचं सेवन तुम्ही दररोज केले तर, शरीरातील होणारे बदल पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल..

Health: चहा-कॉफी म्हटलं की ते अनेकांचे प्रिय पेय आहे. काहीजणांच्या दिवसाची सुरूवातच या दोन गोष्टींनी होते. हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु तुम्हाला माहितीय का? नेहमी दूध आणि पानांचा चहा प्यायल्याने आपल्या शरीराला हानी पोहोचते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला लवंग आणि लिंबू असलेल्या हेल्दी चहाबद्दल सांगत आहोत, ज्याचं सेवन तुम्ही दररोज केले तर, शरीरातील होणारे बदल पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल..
तुम्ही सुद्धा दूधाचा चहा पिता?
हिवाळ्याच्या काळात अनेक लोकांना बऱ्याचदा चहा पिण्याची सवय होते. भारतात प्रत्येक ऋतूत आणि कोणत्याही प्रसंगी इथले लोक चहा पिऊ शकतात. दूध आणि पानांपासून बनवलेला सामान्य चहा आरोग्यासाठी फारसा फायदेशीर नसतो, खासकरून तो रोज प्यायल्यास नुकसान होते. आम्ही तुम्हाला लवंग आणि लिंबूच्या हर्बल टीबद्दल सांगत आहोत, जो घरी सहज बनवता येतो आणि याचे फायदेही आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
डॉक्टर बिमल छाजेड सांगतात की, लिंबू व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे आणि लवंग हे जीवाणूनाशक आहे. म्हणून, दोन्ही एकत्र मिसळल्याने एक उत्तम आरोग्यदायी हर्बल चहा बनतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
लिंबू-लवंग चहाचे फायदे
पचन सुधारते - लिंबू आणि लवंग दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात. लवंगात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्याचबरोबर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत होणे - लिंबू व्हिटॅमिन सीचा स्त्रोत आहे आणि लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराला रोगांशी लढण्यासाठी मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करतात.
वजन कमी करणे - लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे चयापचय मजबूत करते आणि लवंग वजन कमी करण्यास मदत करते. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते.
दातांच्या समस्या - लवंगात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे दात आणि हिरड्या मजबूत करतात. हिरड्यांची सूज कमी करण्यासाठीही लवंग फायदेशीर मानली जाते. त्याच वेळी, लिंबू दातांचा पिवळेपणा आणि दुर्गंधी दूर करते.
त्वचेसाठी फायदेशीर - लिंबू आणि लवंग दोन्ही त्वचेला आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला मुरुमांपासून मुक्त आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
हा चहा कसा बनवायचा?
यासाठी 1 ग्लास पाण्यात 2 लवंगा आणि 1 लिंबाचा रस मिसळा आणि उकळवा. तुम्ही हे असे पिऊ शकता, अन्यथा थोडे मध टाकून देखील पिऊ शकता. ते रिकाम्या पोटी पिऊ नका. जर तुम्हाला प्यायचे असेल तर त्यापूर्वी 2 ग्लास पाणी प्या.
हेही वाचा>>>
Weight Loss: ना कोणता व्यायाम..ना कोणतं डाएट..3 आठवड्यांत वजन केलं कमी? आर. माधवनने सांगितलं 'वेट लॉस सीक्रेट! एकदा जाणून घ्याच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )



















