Health: मंडळींनो.. मणक्याच्या आरोग्याबद्दल 'या' गैरसमजूती आजच दूर करा! डॉक्टर सांगतात, ते लक्षपूर्वक वाचा..
Health: खरंतर, प्रत्येकाने मणक्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्याबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करुन त्यामागची वास्तविकता जाणून घेतली पाहिजे.

Health: अनेक लोकांना असे वाटते की वय झाले की पाठदुखी (Back Pain) ही होतेच आणि पाठदुखी झालीच तर त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन ती बरी देखील होते. हे केवळ गैरसमज आहेत जे कसलाही विलंब न करता दूर करणे गरजेचे आहे. या गैरसमजूतींमुळे वेळीच उपचारास विलंब होतो आणि भविष्यातील गुंतागुंत वाढते. विशेषत: पाठीच्या आणि मणक्याच्या समस्या, जसे की चुकीच्या शारीरीक स्थितीत फार काळ बसणे आणि व्यायामाचा अभाव यासारख्या विविध चिंताजनक (Health News) घटकांमुळे पाठदुखीच्या समस्या सामान्यपणे आढळून येतात. खरंतर प्रत्येकाने मणक्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्याबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करुन त्यामागची वास्तविकता जाणून घेतली पाहिजे. याबाबत खारघर, नवी मुंबई मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथील स्पाइन सर्जन डॉ. बुरहान सलीम सियामवाला यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घेऊया..
काय आहेत गैरसमजुती?
पाठदुखी ही वयोवृध्दांमधील एक सामान्य समस्या?
वास्तविकता : मणक्याच्या समस्या या वयानुसार अधिक सामान्य वाटत असल्या तरी त्अतुक व्यवस्थापनाने त्या टाळता येऊ शकतात. व्यायामादरम्यान झालेल्या दुखापती किंवा अपघात, लठ्ठपणा किंवा जड वस्तू उचलण्याचे चुकीचे तंत्र यामुळे अनेक लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य शारीरीक मुद्रा आणि वेळीच व्यवस्थापन करून वृद्धापकाळातही तुमचा पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक राहू शकतो.
विश्रांती घेणे हा पाठदुखीचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग?
वास्तविकता : दीर्घकाळ बेड रेस्टमुळे तुमच्या पाठीचा कणा आणखी कमकुवत होऊ शकतो आणि बरे होण्यास विलंब होऊ शकतो. सौम्य हालचाली, स्ट्रेचिंग आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी केल्यास जलद बरे होता येते स्नायुंचा कडकपणा कमी करण्यास मदत होते. फिजिओथेरपी हा उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याकडे रुग्णांनी दुर्लक्ष करु नये, कारण ते पाठीचा कणा मजबूत राखण्यास मदत करते.
जड वस्तू उचलणे हे पाठदुखीचे एकमेव कारण?
वास्तविकता : चुकीच शारीरीक स्थिती, कमकुवत स्नायू आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे यामुळे देखील पाठदुखीची समस्या होऊ शकते. या कारणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. म्हणून, जड वस्तू उचलताना योग्य तंत्राचा वापर करणे आणि योग्य शारीरीक स्थिती राखणे गरजेचे आहे.
दीर्घकालीन पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय?
वास्तविकता : मणक्याच्या समस्या हे योग्य औषधोपचार, फिजिओथेरपी, शारीरीक स्थिती सुधारणे आणि अचूक बदलांनी देखील व्यवस्थापित करू शकता. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करणे आणि पौष्टिक आहाराच्या सेवनाने देखील ही स्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते. शस्त्रक्रिया ही केवळ मज्जातंतूवर येणारा दाब किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये आवश्यक आहे, कारण या समस्या एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्या वर परिणाम करतात. त्यामुळे घाबरू नका आणि वेळीच उपचार करा.
हेही वाचा :
World Spine Day 2025: सावधान! सध्या गरोदर महिलांना 'हा' त्रास प्रचंड सतावतोय, अजिबात दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


















