एक्स्प्लोर

अ‍ॅसिडिटी वाटतेय? ही लक्षणं हायटल हर्नियाची असू शकतात! आहारातील या चूका बाधू शकतात, डॉक्टर सांगतात...

Hiatal Hernia: जीवनशैलीत बदल हा उपचारांचा पहिला टप्पा आहे. बहुतेक हायटल हर्नियाची लक्षणे ही अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे उद्भवत असल्याने, आहारातील बदल या समस्येत लक्षणीयरीत्या मदत करू शकतात.

Health: हायटल हर्निया ही एक अशी स्थिती आहे ज्यात पोटाचा काही भाग अन्ननलिकेच्या समोरील बाजूला छातीतमध्ये ढकलला जातो, तेव्हा या प्रकारचा हर्निया होऊ शकतो. यामध्ये पोटाचा भाग हा छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या माध्यमातून निघतो. वाढत्या वयानुसार हायटल हर्निया होण्याची शक्यता वाढते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 55 ते 60% व्यक्ती हायटस हर्नियाने ग्रस्त असल्याचे दिसून येते. यापैकी 9 ते 10% व्यक्तींमध्ये याची लक्षणे आढळून येतात. (Hiatus Hernia)

हायटल हर्निया जन्मजात किंवा वाढत्या वयात उद्भवू शकतो. पोटात दाब निर्माण करणाऱ्या परिस्थिती यास कारणीभूत ठरु शकतात. उदाहरणार्थ लठ्ठपणा, गर्भधारणा, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, सीओपीडी, आघात, मागील शस्त्रक्रिया आणि अनुवंशिकता यासारखे इतर घटक देखील त्याच्या विकासात कारणीभूत ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे स्नायू कमकुवत होणे. डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी या आजाराची लक्षणे तसेच उपचार, काय काळजी घ्यावी? याबाबत ही माहिती दिली आहे. डॉ अपर्णा भास्कर या मुंबईच्या सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्ससह मेटाहील - लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर येथे बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत.

कशामुळे होतो हायटस हार्निया?

हायटल हर्नियामध्ये पोटाचा वरचा भाग डायफ्रामॅटिक ओपनिंगमधून छातीत ढकलतो, ज्यामुळे अन्ननलिकेच्या खालच्या टोकावरील स्नायूंच्या झडपेला धोका निर्माण होतो. झडप सैल आणि शिथिल झाल्यामुळे पोटातील घटक आणि आम्ल अन्ननलिकेत जाऊ शकते, ज्यामुळे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) होतो. लहान हायटल हर्नियाची बहुतेकदा लक्षणे आढळून येत नाहीत आणि सामान्यतः औषधांनी त्यावर उपचार केले जातात. मोठ्या हायटल हर्नियाला सहसा लॅपरोस्कोपिक फंडोप्लिकेशनच्या स्वरूपात शस्त्रक्रिया करावी लागते.

लक्षणे कोणती?

बहुतेक हायटल हर्निया लहान असताना त्याची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र मोठ्या हायटल हर्नियामध्ये खालील लक्षणे आढळतात:

  1. ढेकर येणे, उलट्या होणे
  2. छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स

  3. पोट किंवा छातीत दुखणे

  4. गिळण्यास त्रास होणे

  5. खूप पोट भरल्यासारखे वाटणे, विशेषतः जेवणानंतर

  6. काळ्या रंगाचा मल येणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे, जे कधीकधी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे लक्षण असते

  7. जुनाट खोकला आणि दम्यासारखी लक्षणे

  8. आवाजात बदल होणे

उपचार काय?

जीवनशैलीत बदल हा उपचारांचा पहिला टप्पा आहे. बहुतेक हायटल हर्नियाची लक्षणे ही अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे उद्भवत असल्याने, आहारातील बदल या समस्येत लक्षणीयरीत्या मदत करू शकतात. एकाच वेळी पोटभर न जेवता ठराविक अंतराने थोडे थोडे खाणे योग्य राहिल. झोपण्यापूर्वी भरपेट आहार किंवा नाश्ता करणे टाळा, धूम्रपानासारखी सवय सोडणे हा देखील एक प्रभावी मार्ग आहे. रुग्णांना छातीत जळजळ टाळण्यासाठी जेवणानंतर लगेच झोपणे किंवा वाकणे टाळा.

हायटल हर्नियाची लक्षणे व्यवस्थापित करण्यात औषधे महत्त्वाची भूमिका बजावतात, विशेषतः अ‍ॅसिड रिफ्लक्सशी संबंधित लक्षणे आढळल्यास याची मदत होते. अँटासिड्स सामान्यतः पोटातील अ‍ॅसिड निष्क्रिय करण्यासाठी वापरले जातात, तर एच2-रिसेप्टर ब्लॉकर्स हे अ‍ॅसिड उत्पादन कमी करण्यास मदत करतात. प्रोटॉन पंप इनहिबिटर (पीपीआय) हा आणखी एक प्रभावी पर्याय आहे, कारण ते अ‍ॅसिड उत्पादन पूर्णपणे रोखतात, ज्यामुळे अन्ननलिकेचे कार्य सुरळीत राखता येते.

शस्त्रक्रियेचा सल्ला कधी दिला जातो?

जेव्हा रुग्ण वैद्यकीय उपचार थांबवू शकत नाहीत, वैद्यकीय व्यवस्थापनानंतरही त्यांना आराम मिळत नाही किंवा रुग्णाला अन्ननलिकेतील अल्सर, श्वासनलिकेतील रिफ्लक्स, बॅरेट्स एसोफॅगस इत्यादी गुंतागुंत निर्माण होते तेव्हा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.

अशा प्रकरणांमध्ये लॅप्रोस्कोपिक फंडोप्लिकेशन ही सामान्यतः केली जाणारी कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रिया आहे ज्यामुळे लक्षणे कमी होतात आणि भविष्यातील गुंतागुंत देखील टाळता येतात. फंडोप्लिकेशनमध्ये छातीतून हर्निएटेड घटक पोटात परत आणणे, सैल झालेली झडप घट्ट करणे आणि पोटाचे आवरण तयार करणे समाविष्ट आहे. या प्रक्रियेत रुग्णांना कमी वेदना होतात, रुग्ण लवकर बरा होतो आणि शस्त्रक्रियेनंतर 24 ते 48 तासांत त्यांना घरी सेडले जाते.

जर तुम्हाला वरील कोणतीही लक्षणे आढळली आणि तुम्हाला अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा हायटस हर्निया असल्याचा संशय असेल, तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शन आणि वेळीच उपचार भविष्यातील गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकतात.

हेही वाचा

Hair Fall Astrology : वारंवार केसगळती होतेय? कुंडलीतील 'या' ग्रहाचा सर्वात जास्त परिणाम, वाचा ज्योतिषशास्त्र

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं?
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Embed widget