एक्स्प्लोर

Hair Health: तुमचे केस वेगानं, अतिप्रमाणात गळतायत? टक्कल पडत चाललंय? काय आहे अलोपेसिया? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

Hair Health: अलोपेसिया अरेटा ही वेदनादायक स्थिती नाही, परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करते, ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि इतर भावनिक समस्या उद्भवतात. 

Hair Health: चेहरा, त्वचेप्रमाणे केस देखील सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. केसांमुळे व्यक्तीचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. तुमचे केस वेगानं आणि अतिप्रमाणात  गळत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करायला हवेत.  काय आहे अलोपेसिया? द एस्थेटिक क्लिनिकच्या कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन,  कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, डॉ. रिंकी कपूर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

काय आहे अलोपेसिया अरेटा?

अलोपेसिया अरेटा हा केसगळतीचा सर्वात सामान्य विकार आहे. अलोपेसिया म्हणजे टक्कल पडणे आणि अरेटा म्हणजे केस गळणे आणि हा आजार सामान्यतः सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसून येतो. ॲलोपेसिया एरियाटामुळे टाळूवर आणि शरीराच्या इतर भागांवर केस लहान गोलाकार पॅचमध्ये गळतात.  अॅलोपिसिया अरेटा एक ऑटोइम्यून(Autoimmune Disease)आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज्यांचे काम आजारांशी लढण्याचे असते. अशा पेशी हेयर फॉलिक्स (Hair Follicles)वर हल्ला करतात. त्यामुळे केस वेगानं गळायला सुरूवात होते.  केस गळणे जसजसे वाढत जाते तसतसे पॅच एकमेकांना जोडतात आणि संपुर्ण टाळूवर टक्कल पडू लागते. हे केस सामान्यतः काही महिन्यांत पुन्हा वाढतात, परंतु उपचार न केल्यास अशा प्रकारचे केस पुन्हा गळतात. केसांची वाढ आणि केस गळतीचे चक्र हे वर्षानुवर्षे टिकू शकते. अलोपेसिया एरियाटा ही वेदनादायक स्थिती नाही, परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करते ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि इतर भावनिक समस्या उद्भवतात. ॲलोपेसिया एरियाटा वर कायमस्वरूपी इलाज नाही, पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन करु शकता आणि भविष्यात केस गळण्याची समस्या टाळू शकतात.

ॲलोपेसिया अरेटा कशामुळे होतो?

ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा इम्यून सिस्टीम चुकून हेयर फॉसिल्सना लक्ष्य करते. त्यामुळे केस गळतात. त्याची लक्षणे, कारणे आणि उपायांची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली केसांच्या मूळांवर हल्ला करते आणि त्यामुळे केस गळू लागतात आणि पातळ होतात. 

ॲलोपेसिया अरेटास कारणीभूत घटक

* कौटुंबिक इतिहास
* मधुमेह
* संधिवात
* व्हायरल इन्फेक्शन
* हार्मोनल बदल
* आघात
* भावनिक किंवा शारीरिक ताण

अलोपेसिया अरेटाची लक्षणे

तज्ज्ञ सांगतात, जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये याचे पहिले मुख्य लक्षण म्हणजे टाळूवर पॅचेस पडणे. पापण्या, भुवया, दाढी, हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवरीलही केस गळतात. काही लोकांमध्ये, लक्षणे दिसण्यास विलंब होतो, परंतु काही प्रकरणांमध्ये, ते जलद आणि अपरिवर्तनीय असू शकतात. केस गळल्यानंतर सहसा पुन्हा वाढतात, परंतु पुन्हा वाढलेले केस हे एकसारखे नसतात आणि ते हलके रंगाचे असतात. असे देखील होऊ शकते की, जेव्हा एक पॅच पुन्हा वाढतो तेव्हा दुसरा पॅच तयार होऊ शकतो.

निदान कसे होते? 

तज्ज्ञ सांगतात, केस गळतीचे उपचार वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. जसे की सुरुवातीचे वय, केस गळण्याचे प्रमाण, नखांमधील बदल आणि इतर वैद्यकीय परिस्थिती. एक साधी ट्रायकोस्कोपी आणि त्वचेची बायोप्सी देखील ट तज्ञांना केस गळण्याचे प्रकार आणि कारण अधिक चांगल्या प्रकारे निर्धारित करण्यात मदत करतात.

अलोपेसिया अरेटाचे प्रकार

ॲलोपेसिया अरेटाचे अनेक प्रकार आहेत. ते केस गळण्याच्या प्रमाणात वैशिष्ट्यीकृत आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या केस गळतीचे उपचार देखील भिन्न आहेत

ॲलोपेशिया अरेटा - हा सर्वात सामान्य प्रकारचा अलोपेसिया आहे, ज्यामध्ये केस नाण्यांच्या आकाराच्या पॅचमध्ये पडतात.
 
टोटालिस - या प्रकारात तुमच्या डोक्यावरील केस पूर्णच गळतात.

युनिव्हर्सलिस - हा एक दुर्मिळ प्रकार आहे. याच डोके, चेहरा आणि शरीराच्या इतर भागातले केस पूर्णपणे गळतात.

डिफ्यूज अलोपेसिया एरियाटा - हे केस गळतीसारखेच दिसते, सामान्यतः कोणतेही पॅच नसतात आणि संपूर्ण टाळूवर केस पातळ होतात.

ओफियासिस अलोपेशिया - केस गळणे हे टाळूच्या मागील आणि खालच्या बाजूने होते.

अलोपेसिया अरेटा केस गळती उपचार

अलोपेसिया अरेटासाठी भारतात केस पुन्हा वाढवण्याचे उपचार तुमचे वय, केस गळण्याचे ठिकाण आणि तुमचे केस गळण्याचे प्रमाण यावर अवलंबून असेल. जर अलोपेसिया अरेटा एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा असेल तर तुमचे केस जास्त उपचार न करता वाढू शकतात.

उपचार पर्याय:

मिनोक्सिडिल (Minoxidil)
केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ओव्हर-द-काउंटर मिनोऑक्सिडिल स्काल्पवर लावले जाऊ शकते.

अँथ्रॅलिन (Anthralin)
हे औषध प्रभावित भागात लागू केले जाते आणि केस गळतीस कारणीभूत असलेल्या रोगप्रतिकारक प्रतिसादात बदल करतात असं मानलं जातं.

कॉर्टिकोस्टिरॉईड्स (Corticosteroids)
टॉपिकल किंवा इंजेक्टेड कॉर्टिकोस्टिरॉईड्स प्रभावित भागात जळजळ कमी करू शकतात आणि केसांच्या वाढीस उत्तेजन देऊ शकतात.

हेही वाचा>>>

Women Health: 'आलिया, शिल्पा, सोनम यांनी मूल झाल्यावर 'असं' काय खाल्लं? लगेच Fit कशा झाल्या?' अभिनेत्रींचा डाएट प्लॅन माहितीय?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget