एक्स्प्लोर

Shravan 2023: श्रावणात उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने आहे लाभदायक; वाचा सविस्तर

हिंदू धर्मात श्रावणाला फार महत्व आहे. येत्या 18 जुलैपासून श्रावणाला सुरूवात होत आहे. या महिन्यात अनेक लोक उपवास करतात. उपवासाचे आरोग्याला काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

Fasting Benefits :  हिंदू धर्मात श्रावणाला (Shravan) फार महत्व आहे. या महिन्यात शंकराची पूजा केली जाते. येत्या 18 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. श्रावण महिना देशभरातील लोकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या संपूर्ण महिन्यात येणार्‍या सर्व सोमवारी बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात. अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलची पाने अर्पण करतात. यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण महिन्यात लोक सात्विक भोजन करतात. याचे शरीराला अनेक फायदे होतात.

श्रावण महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते. या ऋतूत वातावरणातील आर्द्रताही वाढते. या आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. यामुळेच या ऋतूमध्ये पोट खराब होणे, अपचन, ऍसिडिटी, अन्नातून विषबाधा (Food Poisoning) अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

श्रावणात उपवास करणे का गरजेचे आहे?

श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावतात. पोटांच्या बऱ्याच समस्या देखील पावसाळ्याच्या ऋतूतच होतात. श्रावणात उपवास केल्याने रोजच्या खाण्यात पालेभाज्यांचा समावेश केला जात नाही. यामुळे तुम्ही संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकता.

श्रावणात उपवास करण्याचे काय फायदे आहेत (Benefits Of Fasting)

आयुर्वेदानुसार जर तुम्ही श्रावण महिन्यात एक दिवसही उपवास ठेवलात तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत नाहीत. असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. पोटदुखी , गॅस, अॅसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.तसेच उपवास केल्याने भूक चांगली लागते तर वजन कमी होण्यास देखील मदत होते. उपवासाच्या वेळी द्रव पदार्थ जास्त खाल्ले जातात यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. तुमच्या रोजच्या आहाराचा थेट परिणाम हा त्वचेवर होतो. उपवासात बाहेरचे जंक फूड खाल्ले जात नाही. सोबतच मसालेदार पदार्थ देखील खाल्ले जात नाही. यामुळे त्वचा चांगली राहते. उपवास केल्याने कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसेच उपवासामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणीत राहण्यास मदत होते.

 

इतर महत्वाच्या बातम्या

(Dislmaier: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget