एक्स्प्लोर

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष

Why Do I Feel Thirsty After Drinking Water: पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे किंवा घसा कोरडा पडणे ही साधी गोष्ट नाही. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता किंवा इतर आरोग्याच्या समस्यांचे हे संकेत असू शकतात.

Dehydration And Thirst News : कडक उन्हात फिरल्यानंतर, जास्त घाम आल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी पिल्यास तहान भागणे आणि शरीराला आराम मिळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, भरपूर पाणी पिऊनही थोड्याच वेळात पुन्हा घसा कोरडा पडत असेल किंवा वारंवार तीव्र तहान लागत असेल, तर या समस्येकडे निव्वळ हवामानाचा प्रभाव म्हणून दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

तज्ज्ञांच्या मते, पाणी पिऊनही सतत तहान लागणे हे शरीरातील पाणी आणि अत्यंत महत्त्वाच्या खनिजांचे (Minerals) संतुलन बिघडल्याचे गंभीर लक्षण असू शकते.

Electrolyte Imbalance : जास्त पाणी पिण्यानेही बिघडू शकते शरीराचे संतुलन

आपल्या शरीराला फक्त पाण्याचीच नव्हे, तर सोडियम (Sodium), पोटॅशियम आणि क्लोराईडसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही तेवढीच गरज असते. हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

जेव्हा एखादी व्यक्ती कमी वेळात प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिते, तेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण अत्यंत पातळ (Dilute) होते. यामुळे शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते आणि हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी शरीर मेंदूला वारंवार तहान लागल्याचे संकेत पाठवते.

Hyponatremia Risk : वॉटर इंटॉक्सिकेशनचा धोका

प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याच्या दुर्मिळ स्थितीला वैद्यकीय भाषेत 'हायपोनेट्रेमिया' (Hyponatremia) किंवा 'वॉटर इंटॉक्सिकेशन' (Water Intoxication) असे म्हणतात. या स्थितीत रक्तातील सोडियमचे प्रमाण कमालीचे घटते.

सोडियम कमी झाल्यामुळे शरीरातील पेशींना (Cells) सूज येऊ शकते आणि फ्लूइड बॅलन्स पूर्णपणे बिघडतो. यामुळे सतत तहान लागण्यासोबतच इतर आरोग्यविषयक समस्याही निर्माण होऊ शकतात.

Exercise And Weather Impact : व्यायाम आणि उन्हाळ्यात का वाढते तहान?

उन्हाळ्यात किंवा कडक व्यायामानंतर घामावाटे शरीरातून केवळ पाणीच नाही, तर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोलाइट्सही बाहेर पडतात. अशा वेळी साधे पाणी पिल्यास शरीरातील पाण्याची पातळी वाढते, पण इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता कायम राहते.

याच कारणामुळे भरपूर पाणी पिऊनही काही वेळ तहान लागल्याची जाणीव होत राहते. त्यामुळे अशा परिस्थितीत साध्या पाण्यासोबत लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेणे फायदेशीर ठरते.

Side Effects Of Medicines : औषधांचाही असू शकतो परिणाम

सतत तहान लागण्याचे कारण प्रत्येक वेळी पाण्याची कमतरता असतेच असे नाही. काही विशिष्ट औषधे, विशेषतः लघवीवाटे शरीरातील पाणी बाहेर काढणारी (Diuretics) औषधे, शरीरातील द्रवाचे प्रमाण प्रभावित करतात.

जर एखादे नवीन औषध सुरू केल्यानंतर तुम्हाला अचानक वारंवार तहान लागण्याचा त्रास सुरू झाला असेल, तर स्वतःहून औषध बंद न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

When To See Doctor : डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

उन्हाळ्यात किंवा शारीरिक मेहनतीनंतर तहान लागणे ही सामान्य बाब आहे. मात्र, कोणतेही उघड कारण नसताना जर तुम्हाला सतत तीव्र तहान लागत असेल आणि पाणी पिऊनही अजिबात आराम मिळत नसेल, तर त्यामागे मधुमेह (Diabetes) किंवा किडनीशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते. अशा वेळी केवळ सतत पाणी पीत न राहता वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

ही बातमी वाचा: 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
Advertisement

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Embed widget