एक्स्प्लोर

Cancer: गरमा-गरम चहा, कॉफी पित असाल तर सावधान! कर्करोग होण्याचा धोका? सुरुवातीची 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? कसं टाळाल?

Cancer: हिवाळ्यात तुम्ही खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Cancer: सध्या हिवाळा सुरू आहे, अशात गरमा-गरम, वाफाळलेला चहा किंवा कॉफी प्यायला जवळपास सगळ्यांनाच आवडते. तर काही लोक असे आहेत, जे खूप गरम चहा किंवा कॉफी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का? ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. रोज खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने तोंडाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Hot चहा किंवा कॉफीमुळे कर्करोगाचा धोका? तज्ज्ञ सांगतात...

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार तज्ज्ञ शिल्पी अग्रवाल यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय, त्या म्हणतात, अति गरम पेयांचे उच्च तापमान आपल्या शरीरातील पेशींचे विभाजन आणि त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 

चहा-कॉफीचं तापमान किती असायला हवं?

शिल्पी अग्रवाल देखील म्हणतात की, 65 डिग्री सेल्सिअस किंवा 149 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमान असलेले गरम पेय सर्वात धोकादायक मानले जाते, ती म्हणते की पेयांचे तापमान मध्यम पातळीवर ठेवल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. गरम पेयांव्यतिरिक्त, धूम्रपान, मद्यपान आणि खराब दात यांमुळे तोंडाचा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

ग्रासनली कॅन्सर म्हणजे काय?

ग्रासनली कॅन्सर हा एक कर्करोग आहे जो अन्ननलिकेमध्ये होतो. हा कर्करोग अन्ननलिकेच्या आतील थरापासून सुरू होतो आणि जसजसा तो वाढत जातो तसतसा तो बाहेरील त्वचेच्या थरांमध्ये पसरतो. अन्ननलिका कर्करोगाचे दोन सर्वात सामान्य प्रकार आहेत-

एडेनोकार्सिनोमा- एडेनोकार्सिनोमा कर्करोग ग्रंथीच्या पेशींमध्ये तयार होतो. या पेशी अन्ननलिकेच्या कंट्रोलमध्ये असतात, ज्या कफ तयार करतात. सहसा ते अन्ननलिकेच्या खालच्या भागात, पोटाजवळ तयार होतात.

स्क्वॅमस सेल कार्सिनोमा - स्क्वॅमस सेल कार्सिनोमा कर्करोग अन्ननलिकेच्या आतील पातळ पेशींमध्ये तयार होतो. हा कर्करोग अनेकदा अन्ननलिकेच्या वरच्या आणि मधल्या भागात आढळतो.

अन्ननलिका कर्करोगाची लक्षणे

  • अन्नासह श्वास गुदमरण्याची समस्या.
  • जेवण करताना त्रास किंवा वेदना.
  • अचानक वजन कमी होणे.
  • छातीत दुखणे किंवा जळजळ होणे.
  • खोकला किंवा कर्कश आवाज.
  • छातीत अन्न अडकल्यासारखे वाटणे.

हा कर्करोग कसा टाळाल?

  • दारू, धूम्रपान आणि तंबाखूचा वापर सोडून द्या.
  • तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा फायबर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स नियंत्रित करते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
  • कोमट चहा प्या - चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी,
  • अँटीमाइक्रोबियल आणि इम्युनो स्टीमुलेंट अन्ननलिकेच्या कर्करोगात फायदेशीर ठरू शकतात.
  • कोमट कॉफी प्या - कॉफीमध्ये असलेले कॅफिन सायक्लिन-किनेज-4-पेशींची वाढ रोखते. 

हेही वाचा>>>

Weight Loss: कोणत्याही मेहनतीशिवाय...अगदी सहज...महिलेनं तब्बल 19 किलो वजन कमी केलं? सीक्रेट केले शेअर 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report
Nimbalkar War : रणजितसिंहांचा दुग्धाभिषेक,रामराजेंना मिरच्या; संगीत भाऊबंधकीचा प्रयोग Special Report
Zero Hour Nitin Raut on Election : सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लोकशाही धोक्यात?;राऊतांचा हल्लाबोल
Zero Hour Amol Mitkari on Election : विरोधकांचा कुठलाही फेक नरेटिव्ह या निवडणुकीत सेट होणार नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget