Health Tips : महिलांना, मुलींना येणाऱ्या मासिक पाळीचा (Periods) त्रास हा प्रत्येकालाच सहन करावा लागतो. या मासिक पाळीदरम्यान महिलांना काही लक्षणं दिसतात. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की, पोटदुखी, पाठदुखी, राग, चिडचिड, डोकेदुखी या सर्वांबरोबरच मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना (Women) खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर खूप रक्तस्त्राव आणि वेदनांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान काही विशेष लक्षणे दिसत असतील तर चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. 

पीरियड्स दरम्यान अशी काही लक्षणे दिसत असतील तर वेळीच काळजी घ्या.

अचानक रक्त प्रवाह वाढणे

पीरियड्स दरम्यान काहींचा फ्लो जास्त असतो तर काहींचा फ्लो कमी असतो. पण, काही महिलांचा फ्लो जर सामान्यपेक्षा जास्त असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा वेळी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. 

खूप वेदना होणे

मासिक पाळी दरम्यान वेदना होतेच. पण, या दरम्यान काही महिलांच्या वेदना या असामान्य असतात. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त वेदना काही रोग सूचित करू शकतात. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क सागणं गरजेचं आहे. 

जाड रक्ताच्या गाठी तयार होणे

मासिक पाळीत जर तुम्हाला जास्त रक्ताच्या गाठी तयार होत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रक्ताचा रंग बदलणे

मासिक पाळीत रक्ताचा बदलणारा रंग अनेक चेतावणी देतो. जर तुमच्या रक्ताचा रंग खूप गडद किंवा जाड असेल तर यातून तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे असे दिसून येते. 

पीसीओडी (PCOD) आणि पीसीओएस (PCOS) सारख्या आजारांमध्ये पीरियड्सशी संबंधित समस्या आहेत. याबरोबरच कॅन्सरचा धोकाही वाढतो. त्यामुळे महिलांना जर वरीलपैकी कोणताही त्रास होत असेल तर क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या